1 min read

राष्ट्रीय दीपस्तंभ” या राष्ट्रीय पुरस्काराने समाजसेवक शेख रफिक शफीयोद्दिन हे सन्मानित …

Loading

“राष्ट्रीय दीपस्तंभ” या राष्ट्रीय पुरस्काराने समाजसेवक शेख रफिक शफीयोद्दिन हे सन्मानित …

औरंगाबाद. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचेे औचित्य साधून शनिवार दि. 7 जानेवारी रोजी राष्ट्रीय पत्रकार मेळावा व दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नाशिकच्या मुं.श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय शालिमार, नाशिक येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिकच्या वतीने समाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल समाजसेवक शेख रफिक यांना नाशिक येथे “राष्ट्रीय दीपस्तंभ” या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले गोरगरीब निराधाराना मदतिचा हात.हिवाळ्यात गरजूंना ब्लॅंकेट वाटप. घाटी
रुग्णालयातील रुग्णांना मदतीचा हात. अशे अनेक सामाजिक कार्य
शेख रफिक यांनी केले आहे.भव्य दिव्य कार्यक्रमात मराठी सिनेअभिनेत्री स्मृती प्रभू, अभिनेत्री मेघा पाटील, माजी मनपा सभागृह नेते श्री.दिनकर अण्णा पाटील.ड्रीम डेस्टिनेशनच्या संचालिका शबनम खान . पैठणी उद्योजक अमोल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.आदी मान्यवरांच्या हस्ते शाल, तसेच शानदार सन्मानचिन्ह सह सन्मान पत्र देऊन समाजसेवक शेख रफिक यांना हा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यातआले त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय एकूण 7 पुरस्कार मिळाले आहे. याची दखल घेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक च्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *