अमळनेरात पत्रकार दिन उत्साहात साजरा
![]()
अमळनेरात पत्रकार दिन उत्साहात साजरा
अमळनेर ६ जानेवारी


येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार पर भावनाच्या नियोजित जागेवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या पत्रकार दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे अमळनेर मधील पत्रकारांच्या दोघेही संघटना म्हणजे अमळनेर शहर पत्रकार संघ व महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी एकत्र आलेले होते. यावेळी सुरुवातीला संजय पाटील यांनी प्रास्ताविकात बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण प्रवासाविषयी माहिती दिली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. नंतर दिवंगत झालेल्या सर्व पत्रकारांना श्रद्धांजली देण्यात आली. अमळनेर शहरातील आटकाव व लेखनमंच या दिग्दर्शकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मनोतात ऍड. ललिता पाटील यांनी पत्रिकारांचे कौतुक करून वृत्तपत्रांविषयी आपल्या लहानपणीच्या आईविषयी काही आठवणी सांगितल्यानंतर संपादकीयमध्ये सर्व माहिती मिळायची असे सांगितले. त्यानंतर डॉ. अनिल शिंदे यांनी पत्रकारांनी आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यावे यासाठी वर्षात किमान एकदा पत्रकारांचे संपूर्ण आरोग्य तपासणी करून देण्याचे अश्वासन दिले.माजी आमदार डॉ. बी.एसपाटील यांनी नकारात्मक बातमी बनविताना तिची शहानिशा करून बातमी करावी, आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले.अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार भवनासाठी दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी भलेही आमदार निधीत काही अडचण असो पण मी वैयक्तिक निधी देऊन ते पूर्ण करण्याचा बांधील असल्याचे सांगितले व पत्रकारांच्या बातमीची प्रशंशा केली. छोट्याखाली झालेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील सामाजिक ,राजकीय व प्रशासनातील अधिकारी हजर होते. त्यात आ.अनिल पाटील, ऍड. ललिता पाटील,माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार डॉ बी.एस.पाटील डॉ.अनिल शिंदे, गोकुळ बोरसे, जेष्ठ पत्रकार श्री दिगंबर महाले, श्री पांडुरंग पाटील,जयवंत पाटील ,मनोज पाटील, बी.के सूर्यवंशी, विक्रांत पाटील, महेंद्र बोरसे, शितल देशमुख, नगरपालिका प्रशासक प्रशांत सरोदे,संजय चौधरी, भरत वारे, अशोक पाटील,रणजीत शिंदे, जितेंद्र झाबक, माधुरी पाटील, वसुंधरा लांडगे,प्रवीण पाठक, पंकज चौधरी,अबू महाजन, पांडुरंग महाजन,प्रवीण जैन, डॉ.प्रकाश ताडे , महेश देशमुख, सुरेश पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम.एस.वाघ,दिनेश नाईक, प्रा. डॉ.अरुण कोचर असंख्य मान्यवर व पत्रकारांमध्ये प्रा. चंद्रकांत गाढे, समाधान मैराळे, उमेश काटे,दिनेश पालवे, अजय भामरे, नूर खा पठाण, चंद्रकांत काटे ,किरण पाटील ,जितू ठाकूर, जयवंत वानखेडे,रोहित भटेजा, कमलेश वानखेडे, धनंजय सोनार, हितेश बडगुजर, राहुल पाटील,रवींद्र पाटील, सुखदेव ठाकूर आदी उपस्थित होते.
कोट
या पत्रकारांचा झाला विशेष सत्कार
मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार अमळनेर तालुका पत्रकार संघाला मिळाला म्हणून अध्यक्ष चेतन राजपूत व सचिव चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आपली पत्रकारिता सांभाळताना वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या श्री उमेश काटे, श्री दिनेश पालवे,श्री अजय भामरे, श्री ईश्वर महाजन यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.


