ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सोबत शैक्षणिक काम करणाऱ्या सहकारी शिक्षिका भारतातील मुस्लिम समाजातील प्रथम आद्य शिक्षिका क्रांतिज्योती फातीमाबी शेख यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन !…
![]()

📙….९ जानेवारी…📙
ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सोबत शैक्षणिक काम करणाऱ्या सहकारी शिक्षिका ……
भारतातील मुस्लिम समाजातील प्रथम आद्य शिक्षिका…..
क्रांतिज्योती फातीमाबी शेख यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन !…..
👏👏🪔🪔🌸🌸 महाराष्ट्रातील कुठल्याही एका विद्यापीठाला फातिमाबी शेख यांचे नाव दिले गेले पाहिजे व त्यांच्या नावाने स्रीयांच्यासाठी शैक्षणिक योजना सुरू केली जावी. भारतातील पहिल्या मुख्याध्यापक व शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई व क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांना स्री शिक्षणासाठी मोलाची साथ देणाऱ्या फातीमाजी......
आज गुगलने त्यांच्या सन्मानार्थ डूडल ठेवले आहे. जेंव्हा सनातनशाही स्री शिक्षणाला कडाडून विरोध करीत होती तेंव्हा बहुजन समाजातील फुले दाम्पत्यांनी मुस्लिम समाजातील फातीमाबी स्री शिक्षण व बहुजनांचे शिक्षण यासाठी अभूतपूर्व संघर्ष करत होते.
फातिमा शेख या उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या. जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी १८४८ साली स्त्रियांसाठी आशिया खंडातील पहिली शाळा सुरू केली. अशावेळी उस्मान शेख आणि फातिमाबी शेख यांनी त्यांना राहण्यासाठी आणि शाळा चालविण्यासाठी राहते घर दिले. या दाम्पत्याच्या कल्पनेने प्रेरीत होऊन उस्मान शेख यांनीही फातिमा शेख यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची प्रेरणाही दिली. त्यानंतर सावित्रीबाईंच्या बरोबरीने फातिमा शेख यांनीही शिक्षिका होण्यासाठी खूप कष्ट सोसले. बाह्मण्यवादी जातीव्यवस्थेविरोधात महात्मा फुले यांनी लढा पुकारला होता. मात्र, त्यांच्यासोबत शेख यांना देखील सामाजिक रोषाचा, छळाचा सामना करावा लागला.
फातिमा शेख मुलींना शिकविण्याचे काम करीत असत. घरोघरी जाऊन मुलींच्या कुटुंबाशी बोलून मुलींना शाळेत पाठवायला सांगत. शाळेचे कामकाजही त्याच बघत असत. त्यामुळेच फुले यांचे कार्य पूर्णत्वास नेण्यात शेख यांचे मोलाचे योगदान आहे. शिक्षणाचे कार्य अखंड चालू राहण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सावित्रीबाईंचा त्या मोठ्या आधार होत्या. अशा या महामातेला जन्मदिनानिमित्त त्रिवार कोटी कोटी वंदन !…
सोपान भवरे अतिथी संपादक अमळनेर

