भरवस माध्यमिक विदयालयात १० ते ११ जानेवारीला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळानी सहभागी व्हावे
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांचे आवाहन
![]()

भरवस माध्यमिक विदयालयात १० ते ११ जानेवारीला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळानी सहभागी व्हावे
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी भरवस येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १० व ११ जानेवारी २०२३ रोजी श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय येथे होणार आहे. प्रांत, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. अमळनेर व तालुक्यातील सर्व शाळेच्या विद्यार्थ्याचनी आपल्या विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मॉडेल, प्रतिकृती तयार करून घ्यावे. वर्गवार गट तयार केलेले असून गट क्र. एक इ.६ वी ते ८ वी, गट क्र. दोन ९ वी ते १२ वी, गट क्र. तीन स्वतंत्र शिक्षक साहित्य प्राथमिक व माध्यमिक परिचर साहित्य परिपत्रक प्रमाणे तयारी करावी तसेच इ १ली ते ५ वी शिक्षक साहित्य प्रत्येक शाळेचे आवश्यकच आहे. ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता बक्षिस वितरण कार्यक्रम तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थित होईल. असे विज्ञान मंडळाने कळविले आहे.
भरवस तालुका अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयात तालुका विज्ञान प्रदर्शनासाठी सर्वतोपरी नियोजन सुरू आहे असे शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे सचिव बापूसाहेब विजय सोनवणे यांनी सांगितले.

