1 min read

राष्ट्रीय युवा शक्तीच्या माध्यमातून राज्यभर सामाजिक व शैक्षणिक प्रबोधन

Loading

राष्ट्रीय युवा शक्तीच्या माध्यमातून राज्यभर सामाजिक व शैक्षणिक प्रबोधन

अमळनेर : राष्ट्रीय युवा शक्ती दिल्ली महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून राज्यभर सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , विधायक कार्यासाठी प्रबोधनात्मक प्रसार व प्रचार करीत असून त्यात युवक , युवती , विद्यार्थी , पुरुष , महिलांनी सहभाग घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून समाज प्रबोधनाचे कार्य महाराष्ट्र भर सुरू आहे . अन्याय , अत्याचार व भष्ट्राचार संदर्भात यूथचे ध्येय धोरण असून स्वामी विवेकानंदच्या विचार सोबत घेऊन कार्य करीत आहे . त्यात राष्ट्रीय अध्यक्ष राधेवेंद्र पांडे व महासचिव नविनजी मिश्रा व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर , माहिला प्रदेशाध्यक्षा माधुरीताई गुजराथी प्रदेश प्रभारी सुनिल परदेशी व राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी व राज्याचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे . महाराहू युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी सांगितले की , समाजप्रबोधन व जागृती होणे गरजेचे आहे . समाज अधोगती कडे जात असून ज्ञान प्रबोधन होणे गरजेचे आहे . धार्मिकतेच्या बाबतीत त्यांनी सांगितले आहे की , युवकांनी व युवतींनी यूथ मधे सहभाग घ्यावा कार्य करण्यासाठी तत्पर असावे यातून नविन भारताची दिशा दिसेल . नासीक येथे यूथ ने फार मोठा कार्यक्रम घेऊन नासीकच्या नावलौकिकात भर पाडली . संपूर्ण महाराष्ट्रात यूथचे कार्याची रूपरेषा तयार करून कार्याची सुरुवात झाली आहे . बऱ्याच जिल्हयांशी संपर्क झाला असून तेथील पदाधिकारी कार्यासाठी सज्ज असणार आहे . लहान बालकांवर चांगले संस्कार देऊन त्यांना चांगला नागरिक होण्यासाठी यूथ चे कार्य महत्वाचे असणार आहे . आध्यामिक ज्ञानावर भर देऊन धार्मिक कार्य देखील होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी पत्रकातुन सांगितले . महाराष्ट्र ही संताची भूमी असून येथे संस्कार मय नागरिक घडतो . संत ज्ञानेश्वर महाराज , संत तुकाराम महाराज , संत नामदेव महाराज आदिनी आध्यामिक ज्ञान प्रबोधन करुन समाज घडविण्याचे कार्य चिरंतकाळ टिकणारे आहे . म्हणून महाराष्ट्राच्या भूमिला छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार रुजत आहे .यूथचे संगठन देशामधे फार मोठे असून सर्व स्तराचे लोकांचा सहभाग आहे . तरी संगठन वाढण्यासाठी राष्ट्रीय व राज्याचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे . गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यन्त यूथचे कार्य सुरु आहे .पदाधिकाऱ्यांनी मतभेद विसरून कार्याला लागावे असेही आवाहान चिलाणेकर यांनी केले . येणाऱ्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन समाज प्रबोधन करण्यात येणार आहे . महाराष्ट्र कला , संस्कृती , संस्कार , जपणारे राज्य आहे . म्हणून संगठन होण्यास मदत होईल . युवक युवती महिला पुरुष विद्यार्थासाठी विविध वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे . महाराष्ट्र राज्याची युवा शक्तीचे संगठन फार मोठ्या प्रमाणावर भविष्यात वाढणार आहे . राज्याचे सर्व पुरुष व माहिला पदाधिकारी एकत्र येऊन कार्य करणार आहे . त्यात राज्याचे उपाध्यक्ष विलास कच्छवा , महासचिव राहूल जोरे , उदय शेवतेकर , विरेंद्रसिंग टिळे , राजेंद्र आहेर ‘ नितीन गोरे , हसमुख जैन , श्रीमंत सावंत , विलास गायकवाड , योगेश पाटील , युवराज राजपूत , सुभाष सोळंखे महिला महासचिव शिल्पी अवस्थी व मोहिनी भगरे आदि माहिला प्रतिनिधी राज्यात कार्यासाठी नियोजन करणार आहे . जिल्हयातील प्रत्येक गावपातळी पर्यन्त यूथचे कार्य सुरू होणार आहे . तरी राष्ट्रीय युवा शक्ती च्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहान महाराष्ट्र राज्य पुरुष माहिला पदाधिकांऱ्यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *