1 min read

श्री गुरुदत्त मा.विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा भरला.
तब्बल १८ वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी आणि शिक्षक.

Loading

श्री गुरुदत्त मा.विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा भरला.
तब्बल १८ वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी आणि शिक्षक.

शिंदखेडा -: शिंदखेडा तालुक्यातील वरुळ या गावातील श्री गुरुदत्त मा.विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी तब्बल अठरा वर्षानंतर शिक्षक कृतज्ञता सोहळा व स्नेहसंमेलन भरले होते.माजी विद्यार्थी हे २००३/०४ या वर्षातील होते.यावेळेस सेवानिवृत्त व सेवेत असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
वरुळ गावातील माजी विद्यार्थी एकत्र आले.सर्व माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता या सोहळ्यातून आदरभाव व्यक्त केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सध्या सेवेत असलेले शिक्षक मा.अरविंद करनकाळ यांनी भूषविले,तर माजी मुख्याध्यापक मा.सुभाष भिकन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी असलेले,पुण्यात खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित कवी-लेखक मा.विठोबा अशोक साळुंखे यांनी केले.तसेच राहुल माळी व योगिता पाटील यांनी सध्या शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्षीय भाषणाने स्नेहसंमेलनाची सांगता झाली. शेवटी माजी विद्यार्थिनी कविता मराठे हिने आभार प्रदर्शन व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *