1 min read

मारवड येथील उपसरपंचपदी भिकन भालेराव पाटील यांची निवड…
एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड, समर्थकांनी केला जल्लोष…

Loading

मारवड येथील उपसरपंचपदी भिकन भालेराव पाटील यांची निवड…
एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड, समर्थकांनी केला जल्लोष…

अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भिकन भालेराव पाटील यांची काल बिनविरोध निवड पार पडली. यावेळी समर्थक व ग्रामस्थांनी जल्लोष केला.
काल ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मारवड येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात या निवडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिकनराव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून पंचायत समितीतील कृषी अधिकारी एस. व्हि. सोनवणे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच आशा सुभाष भिल, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या उज्वला शरद पाटील, कविता गजानन चौधरी, शीतल अशोक पाटील, रजनी राकेश गुरव, सचिन अशोक पाटील, सुरेश बाविस्कर, जगदीश राजेंद्र भिल उपस्थित होते. यावेळी दिलीप शामराव पाटील, जयवंतराव पाटील, रावसाहेब पाटील, उमेश साळुंखे, गोकुळ साळुंखे, रवींद्र यादवराव पाटील, उमेश सुर्वे, महेंद्र साळुंखे, ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, वासुदेव मारवडकर, चंद्रकांत हिंमतराव साळुंखे, पंकज साळुंखे, जितेंद्र पांडुरंग पाटील, अशोक चौधरी, घनशाम साळुंखे, दिलीप साळुंखे, महेश पाटील, दिलीप चव्हाण, राजेन्द्र साळुंखे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर समर्थक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *