चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे सावित्रीमाई फुले जयंती साजरी
![]()

आज दिनांक 3/1/2023 रोजी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती चामुण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे साजरी करण्यात आली.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांचे हस्ते करण्यात आले.तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची माहिती शाळेतील विशेष शिक्षक हेमंत महाजन सर व विशेष शिक्षका एस.एस.पाटील मॅडम यांनी दिली.सुत्रसंचालन प्रताप पाटील यांनी तर आभार प्रदर्शन जगदीश सोनवणे यांनी केले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

