1 min read

जातीच्या लोकांनी फक्त जयंती साजरी करावी असे काही नसतं माता सावित्रीमाई बहुजनांच्या माता आहेत….
_महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड

Loading

जातीच्या लोकांनी फक्त जयंती साजरी करावी असे काही नसतं माता सावित्रीमाई बहुजनांच्या माता आहेत….
_महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त डॅा. गडगे हॅास्पिटल व साई एशियन नोबेल हॅास्पीटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न
नागापुर- क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयॅतीनिमीत्त डॅा. गडगे हॅास्पिटल व साई एशियन नोबेल हॅास्पीटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे एमायडीसी येथे गडगे हॅास्पीटल येथे आयोजन करण्यात आले होते
यावेळी प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या व महात्मा जोतिबा फुलेंच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले
यावेळी शिबीराच्या उद्धाटनप्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड समवेत उद्योजक भैरवनाथ आदलिंग,डॅा संजीव गडगे,प्रबोध तुपे,सागर चौरे,साळवे मामा तसेच नवनागापुर एमायडीसी ग्रांमपंचायतचे आजी माजी सरपंच,सदस्यासह विवीध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या जिवनावर भाषणातून प्रकाश टाकला,शिबीराचे मुख्य आयोजक डॅा. संजीव गडगे सर यांनी सर्वांचे स्वागत केले तर डॅा. सौ. गडगे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले
यावेळी एमायडीसी ,नवनागापुर तसेच वडगाव गुप्ता येथील बहुसंख्य रुग्नानी या शिबिराचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *