आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चा सहकार्याने रेझिंग डे -2023निमित्त शिशुविकास विद्यालयात चित्रप्रदर्शन शिबिराचे आयोजन
![]()


आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चा सहकार्याने रेझिंग डे -2023निमित्त शिशुविकास विद्यालयात चित्रप्रदर्शन शिबिराचे आयोजन
कल्याण पश्चिम शहर वाहतूक उपशाखा,तर्फे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त, शिशुविकास हायस्कूल मध्ये कल्याण डोंबिवली वाहतूक सहाय्यक पोलीस उपायुक्त आदरणीय श्री.मंदार धर्माधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,वरिष्ठ वाहतुक पोलिस निरीक्षक श्री.महेश तरडे साहेब यांचा नेतृत्वाखाली रेझिंग डे -2023 , चा निमित्ताने चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.यावेळी सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेटे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमांचे पोस्टर प्रदर्शन दाखवले आणि मार्गदर्शन केले. “” मुख्याध्यापक बी. पी. मडके सर यांनी कार्यक्रमासाठी शाळा उपलब्ध करून दिली. आर एस पी अधिकारी शिक्षक, बाबासाहेब गुंजाळ, सतीश भोईर ,
संतोष हंडाळ ,
चंद्रकांत बिरारी यांनी, विशेष सहकार्य केले. रेझिंग डे यशस्वी करण्यासाठी वाहतूक हेड कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मद्यपान करून गाडी चालकास पकडल्यास त्याची चेकिंग कशी करतात त्याचे मशीनचा सह्य्याने प्रॅक्टिकल करून दाखवले, तसेच ई चलन मशीन, जामर,याबाबत माहिती दिली. श्री.भगवान आरोटे, श्रीमती नंदिनी शिंदे, हे. कॉ.श्रोत्रि, उपनिरीक्षक संतोष भालेराव विशेष परिश्रम घेत आहेत. रेझिंग डे कार्यक्रमासाठी आर एस पी अधिकारी युनिट चे मोलाचे सहकार्य लाभत आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे प व सूत्रसंचलन,बाबासाहेब गुंजाळ, व सतिष भोईर सर यांनी केले. आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचा विशेष मार्गदरशनाखाली व संपूर्ण आर एस पी युनिट चा विशेष सहकार्याने रेझींग डे यशस्वी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

