साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन
![]()


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन ) निमित्त अ . शि . प्र . मंडळाचे साने गुरूजी कन्या हायस्कूल , अमळनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान संस्थेचे सहसचिव मा. अँड. श्री . नानासो . अशोक बाविस्कर यांनी भूषविले प्रसंगी विचार मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष मा . अप्पासो . श्री . गुणवंतराव पाटील ,सचिव मा. श्री .दादासो . संदिप घोरपडे सर , सन्मा. संचालक दादासो . प्राचार्य मा . डॉ. शेख सर , सेवानिवृत ज्येष्ठ कलाशिक्षक मा. तात्यासो . श्रावण महाजन,मा . मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम , मा . विलास चौधरी सर ( शिक्षक प्रतिनिधी ) इ . मान्यवर उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सावित्री बाई फुलेंच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले . प्रसंगी मा . मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडमांच्या संकल्पनेतुन छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . विद्यार्थीनींनी नृत्य , नाटिका , कवायत , भाषणे इ. कार्यक्रमांचे उत्साहाने सादरीकरण केले. प्रसगी विद्यार्थीनी नी निर्मित केलेल्या रांगोळी , रेखाचित्रे , पुष्पगुच्छ या कलाकृतीचें प्रदर्शन भरविण्यात आले होते . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत कला शिक्षक मा. श्रावण महाजन सर यांचे हस्ते कलाकृती प्रदर्शनी चे उद्घाटन करण्यात आले .
मा . संदीप घोरपडे सर यांनी स्त्री सक्षमीकरणाविषयी मत प्रकट केले मा . मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे मॅडमांनी माता सावित्रीबाई फुले च्या जीवन
कार्या विषयी माहिती दिली . अध्यक्षीय भाषणात मा . अँड. नानासो . अशोक बाविस्कर यांनी विविध क्षेत्रातील यशस्वी स्त्रीयांचे दाखले देत स्त्री कतृत्वाचा गौरव केला व विद्यार्थीनींच्या कला गुणांचे कौतुक केले . सन्मा. संचालक प्राचार्य डॉ. शेख सरानी इ . ८ वी अ च्या सांस्कृतिक कार्यक्रमाला रोख रकमेचे पारितोषिक दिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु . निकिता पाटील , प्रतिक्षा कापडणे . मोहिनी पाटील , अक्षता कोळी . वैष्णवी पाटील , तनिष्का मोरे या विद्यार्थीनींनी केले . यासाठी मा . मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मंडमांचे विशेष मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले . आभार प्रदर्शन कु . उत्कर्षा महाजन हिने केले .

