1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सावित्रीबाई फुले यांना सम्राट अशोक विद्यालयाने केले पुस्तक रूपी प्रतिमेने अभिवादन !

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सावित्रीबाई फुले यांना सम्राट अशोक विद्यालयाने केले पुस्तक रूपी प्रतिमेने अभिवादन !

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)- कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पुस्तक रुपाने साकारून सावित्रीबाई फुलेंना आगळ्या वेगळ्या पध्दतीने अभिवादन केले .
पाली भाषा प्रचार आणि प्रसार संचालित सम्राट अशोक विद्यालयाच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची २७५. शालेय पुस्तकांच्या सहाय्याने २० बाय १५ फुट लांबी रुंदीची प्रतिमा साकारली . मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून सहशिक्षक ओमप्रकाश धनविजय तसेच रामदास बोराडे यांनी विद्यार्थ्यांच्या सहकर्याने ही प्रतिमा साकारली .
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रभाग ९ आय च्या सहाय्यक आयुक्त सौ हेमा मुंबरकर तसेच गुरुकृपा कॉलेजच्या प्राचार्य विद्युलता कोल्हे या सावित्रीच्या लेकी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या . या समयी सौ हेमा मुंबरकर यांनी सांगितले की आज या पदावर येण्यासाठीचे सर्व श्रेय हे सावित्रीबाई फुले यांनाच जाते तर प्राचार्य विद्युलता कोल्हे यांनी शाळेने साकारलेल्या पुस्तकरूपी प्रतीमेचे तोंडभरून कौतुक केले .
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी टी धनविजय सर,माध्यमिक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, मुख्याध्यापिका सुजाता नलावडेउपस्थित होते. सूत्रसंचालन माधुरी काळे सहशिक्षिका यांनी केले विद्यार्थ्यांसह सह शाळेचा शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *