1 min read

स्त्री मुक्तीच्या आदर्श क्रांतिकारी
सावित्रीबाई फुले…!

Loading

स्री मुक्तीच्या आदर्श क्रांतिकारी
सावित्रीबाई फुले…!

हजारो वर्ष परंपरेच्या खाईत बुडालेला हा समाज त्यात उचनीचतेच्या आधारावर शूद्र अतिशुद्र यावर होत असलेले अन्याय..! विचारांची साखळी जिथे खंडित झाली होती .धर्मचिकित्सा करणे म्हणजे पाप समजले जात होते. स्त्रियावरच्या अन्यायावर तर बोलणेच बंद होते .विधवांचे केशवपन, सतीची चाल, सर्व त्र अन्याय, अत्याचार माजलेला ..! श्रि म्हणजे केवळ भोग वस्तू…! या समाजात श्री जन्म म्हणजे पाप समजले जात होते .घरात मुलगी जन्मली म्हणजे घरात दुःखाची छाया पसरत असे .जी पद्धत आज सुद्धा काही अंशी शिल्लक आहे. आज सुद्धा गर्भ चिकित्सा केली जाते . अशा या बुरसटलेल्या समाजात ,जर खरोखरच देव असतात तर त्या देवाला सुद्धा का या स्रियाची दया आली नाही ..? श्रीला भावना असतात तिला स्वतंत्र व्यक्तीमत्व असते. हे तरी का मानले जात नव्हते..?
अशा विदारक परिस्थितीत महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या। पुण्यासारख्या कर्मठ शहरात सामाजिक समतेची, बंधुतेची ज्योत पेटवताना ह्या पती-पत्नींना त्याकाळी किती त्रास झाला असेल याचा अंदाज, याची कल्पना ,आपण आज करू शकतो का …?त्यातच सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनांक 3 जानेवारी 1831 साली नायगाव सारख्या एका लहानशा खेड्यात झाला. शिक्षणाची परंपरा नसलेल्या अथवा अशिक्षित कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा त्या समाजक्रांतीसाठी महात्मा फुले यांना बरोबर घेऊन श्री शिक्षणासाठी स्वतः हातात पाटी पेन्सिल घेऊन “अ ब क ड” गिरवू लागल्या. त्याकाळी स्त्रियांनी शिक्षण घेणे पाप समजले जात होते. विद्याही फक्त उच्च वर्णी यांच्या अधिकार होते. शिक्षण घेणे ही सुद्धा धार्मिक बाब होती .धर्म हा परमेश्वर निर्मित आहे .त्यामुळे त्यात धळवाढवळ करणे म्हणजे नरका जाणे. हे मानण्यात येत होते. अशावेळी धर्माची चिक्कीसा कोण करेल …?आणि स्त्रियांवरील अन्यायावर वाचा कोण फोडेल..? वास्तविक हिंदू धर्मात स्त्रियांच्या इतका मानसिक, शारीरिक छळ केला गेला एवढा छळ इतर कोणत्याच धर्मात झाला नसेल. हे सर्व दुःखदायक होतं.
सावित्रीबाई साक्षर स्वतःहून त्या स्त्रियांना साक्षर करू लागल्या. धर्माच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या समाजाने त्यांना जाती बाहेर काढले. तरी त्यांनी आपले कार्य खंडित होऊ दिले नाही. स्रि शिक्षणाचा झेंडा त्या फडकवीत राहिल्या .एवढेच नाही तर त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली. आपल्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृह चालविले .गोरगरीब कामगारां साठी रात्रीच्या शाळा काढल्या. विधवा केशवपन, देवदासी पद्धती, विधवा विवाह बंदी इत्यादी दुष्ट प्रथांवर त्यांनी बंदी घालण्यासाठी प्रखर लढा दिला. वास्तविक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या पती-पत्नीच्या हा लढा म्हणजे या देशासाठी एक चमत्कारच होता…!
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समकालीन बरीच मंडळी समाज सुधारण्यासाठी त्या काळी झटत होती. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकर होते. न्यायमूर्ती रानडे होते .बाळशास्त्री जांभेकर होते. पण या मंडळींना सुद्धा श्री शिक्षणाचे महत्त्व त्याकाळी समजले नाही. किंबहुना धर्म व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे बळ त्याच्यामध्ये नसावे .त्यामुळे च ही मंडळी फक्त सुधारक होती .
— परंतु महात्मा फुले हे क्रांती पुरुष होते. त्यामुळे स्त्री शिक्षणाची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केली. त्यांच्या प्रयत्नांना सावित्रीबाई फुलेंनी पाठबळ दिले .या पाठबळामुळेच भारतीय श्री शिक्षणासाठी बाहेर पडू लागली. देवधर्म ,पूजा अर्चा , हळदी कुंकू याच्या पलीकडे भारतीय स्त्रीला अस्तित्व नव्हतं .तीच स्रि शिक्षणामुळे आपले समाजातील स्थान शोधू लागली. ज्ञानाची कवाडे उघडल्यामुळे तिच्या कर्तुत्वाच्या भरारी आकाशाला भिडल्या .स्रि आणि पुरुष हे समान आहेत हेच त्यांनी समाजाला दाखवून दिले. त्यांच्या विचारात शिक्षणाबाबत कळवळा होता. समाजातील उचनिचता नष्ट करायची असेल तर विद्ये शिवाय पर्याय नाही. हे त्या जाणून होत्या.
त्याकाळी त्या म्हणत :
“आपल्या मुला-मुलींना शिकवणे हे प्रत्येक माता-पित्यांचे कर्तव्य आहे .जे माता पिता आपल्या मुलांना शिकवत नाहीत ते त्यांचे शत्रू आहेत असे समजावे.”
समाज परिवर्तनाची त्यांना ओढ होती .एक आदर्श समाजाच्या पाया त्यांनी घडविला. या 21व्या शतकात, आजच्या काळात स्त्रियांच्या कर्तृत्वाच्या भरारी आकाशाला जाऊन भिडल्या,
त्यामुळेच कल्पना चावला सारख्या महिला अवकाशात-अंतराळात जाऊन अजरामर झाल्या. कै. इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होऊन जगात नाव करून गेल्या .श्रीमती प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती सारख्या महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचल्या. आणखीही इतर माता-भगिनी या देशात होऊन गेल्या.
— पण या सत्याच्या जन्म सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वामुळे झाला .हे अखिल मानवास मान्य करावेच लागेल..!म्हणून च त्या विद्देच्या देवता ठरतात.
– त्यामुळेच श्रीमुक्तीच्या आद्य क्रांतिकारक या सावित्रीबाई फुले ठरतात…
गोकुळ बागूल
अमळनेर.
मो. 9422276140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *