कल्याण वाहतूक शाखेतर्फे (रेझिंग डे) ६१ वा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिंवस -2023 निमित्त कार्यशाळा संपन्न शालेय विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे.:वैभव काळे
![]()


कल्याण वाहतूक शाखेतर्फे (रेझिंग डे) ६१ वा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिंवस -2023 निमित्त कार्यशाळा संपन्न शालेय विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे.:वैभव काळे
. ठाणे कल्याण ( मनिलाल शिंपी ): कल्याण पश्चिम शहर वाहतूक उपशाखा,तर्फे ६१ वा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त, अचिव्हर्स कॉलेज येथे कल्याण डोंबिवली वाहतूक सहाय्यक पोलीस उपायुक्त आदरणीय .मंदार धर्माधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,वरिष्ठ वाहतुक पोलिस निरीक्षक .महेश तरडे साहेब यांचा नेतृत्वाखाली रेझिंग डे -2023 ,निमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गार्गी कन्सल्टिंग ड्रायव्हिंग डिफेन्स अकॅडमी चे संचालक वैभव काळे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले.वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले की,प्रत्येक शाळेतून परिपाठाद्वरे विद्यार्थ्यांना दररोज वाहतुकीचा एक नियम समजावून सांगितले तर भावी काळात अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यावेळी ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य हनुमंत म्हसे, मुख्याध्यापिका श्रीमती प्रफुला मॅडम, व ग्लायडस मॅडम , प्रा.अनिकेत पाटील, एन सी सी चे संचालक आकाश काळे यांनी विशेष सहकार्य केले. रेझिंग डे यशस्वी करण्यासाठी वाहतूक हेड कॉन्स्टेबल श्री.भगवान आरोटे, श्रीमती नंदिनी शिंदे, हे. कॉ.श्रोत्रि, उपनिरीक्षक संतोष भालेराव विशेष परिश्रम घेत आहेत. रेझिंग डे कार्यक्रमासाठी आर एस पी अधिकारी युनिट चे मोलाचे सहकार्य लाभत आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे प व सूत्रसंचलन, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी केले.

