1 min read

डोंबिवली येथील ज्ञानमंदिर विद्या संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न मुलांना मुक्तपणे बहरू द्या त्यांचे पंख छाटू नका- अनिल बोरनारे

Loading

डोंबिवली येथील ज्ञानमंदिर विद्या संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न मुलांना मुक्तपणे बहरू द्या त्यांचे पंख छाटू नका- अनिल बोरनारे

ठाणे,डोंबिवली (मनिलाल शिंपी) प्रत्येक मुलाची आवडनिवड व कार्यक्षमता भिन्न असल्याने पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे पाल्यावर न टाकता त्यांना मुक्तपणे बहरू द्या त्यांचे पंख छाटू नका असे आवाहन भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केले.
डोंबिवलीतील उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानमंदिर विद्यासंकुलात प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष आशुतोष येवले, संचालक सदस्य मणिलाल नेरकर, अरुण बहाळकर
लाडशाखीय वाणी समाज डोंबिवली अध्यक्ष विवेक वाणी दिगंबर कोठावदे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शीतल मार्कंडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संगीता पाखले तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपले एकाहून एक कलाविष्कार सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
प्रमुख पाहुणे अनिल बोरनारे यांनी पालकांना पुढे मार्गदर्शन करतांना सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील ५० वर्षाचा विचार करून देशाला नवीन शैक्षणिक धोरण आणले असून हे धोरण शिक्षणात क्रांती घडविणार आहे विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा विकास, कौशल्यआधारीत शिक्षण ही या शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट राहणार आहे. पीएम-श्री स्कुल्स च्या माध्यमातून देशातील शाळांचा कायापालट होणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावणार असल्याचेही अनिल बोरनारे यांनी सांगितले. एकीकडे मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असताना दुसरीकडे डोंबिवलीतील उदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत विद्यार्थ्यांचा आलेख वाढत असल्याने संस्थेचे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक अनिल बोरनारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *