1 min read

आंतरशालेय जलतरण स्पर्धेत इशिता,साहिल विजेते !

Loading

आंतरशालेय जलतरण स्पर्धेत इशिता,साहिल विजेते !

औरंगाबाद:- शिरपूर धुळे येथे नुकत्याच पार पडलेल्या श्री विलेपार्ले केअलावाणी मंडळ यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय जलतरण स्पर्धेत स्विमिंग अससोसिएशन ऑफ औरंगाबाद च्या खेळाडूंनी पदक विजेती कामगिरी केली.ही स्पर्धा 12 व 14 वर्षाखालील वयोगट असणाऱ्या खेळाडूंमध्ये भरविण्यात आली होती.या स्पर्धेत स्विमिंग असोसिएशन ऑफ औरंगाबाद च्या इशिता भावले हिने 50 मी.ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये सुवर्ण,50 मी.फ्री स्टाईल मध्ये कास्य,50 मी.बॅकस्ट्रोक कास्य पदक मिळविले. साहिल गायकवाड याने 50 मी.ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये रौप्य,50 मी.फ्री स्टाईल मध्ये रौप्य,50 मी.बॅकस्ट्रोक रौप्य पदक मिळविले.

तन्मय कल्याणकर याने 50 मी.ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये रौप्य,50 मी.फ्री स्टाईल मध्ये रौप्य,50 मी.बॅकस्ट्रोक कास्य पदक मिळविले.
अहमद यार खान याने 50 मी.ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये कास्य,50 मी.फ्री स्टाईल मध्ये कास्य,50 मी.बॅकस्ट्रोक रौप्य पदक मिळविले.
संविधान सिध्दांत गाडे याने 50 मी.फ्री स्टाईल मध्ये सुवर्ण पदक मिळविले.
वेदांत दंडवते याने सहभागी होत स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.या संघासोबत प्रशिक्षक म्हणून अजयसिंग पाल यांनी काम पाहिले.या पदक विजेत्या कामगिरी बद्दल स्विमिंग असोसिएशन ऑफ औरंगाबाद चे अध्यक्ष रुस्तुम तुपे,राजेंद्र काळे,विष्णू लोखंडे,अभय देशमुख,रवींद्र राठी,सुशील बंग,रवींद्र पवार,एकनाथ मगर,एकनाथ शेळके,निखिल पवार,अजय दाभाडे, सुभाष भावले, सिध्दांत गाडे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *