1 min read

ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्हा कोअर कमिटी ची बैठक संपन्न

Loading

ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्हा कोअर कमिटी ची बैठक संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

ग्राहक कल्याण फाऊंडेशन या राज्यस्तरीय ग्राहक संघटनेची जळगाव जिल्हा कोअर कमिटीची बैठक बुधवार दि.२८रोजी संध्या.६.०० वाजताजोशी हॉस्पिटल अमळनेर येथे संघटनेचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष हृदयरोग तज्ञ डॉ.अविनाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.दोन तास चाललेल्या या बैठकीत
अमळनेर येथे तहसिल कार्यालयात २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करतांना योग्य त्या शिष्टाचाराचे पालन केले गेले नाही.
पत्रकारांना योग्य त्या सन्मानाने न बोलाविल्यामुळे या कार्यक्रमाचे वृत्त प्रमुख वर्तमान पत्रात प्रसिद्धीस आले नाही.
प्रमुख अधिकारी वर्ग योग्य त्या प्रोटोकॉल च्या अभावी अनुपस्थित राहीले.
पुन्हा असे घडू नये म्हणून
याबाबी अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्या लक्षात आणुन देणे,
ग्राहक कल्याण फाऊंडेशन संघटनेच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व कार्यरत जिल्हा अध्यक्ष यांची बैठक अमळनेर येथे आयोजित करणे,
ग्राहकांच्या तक्रारीचे वेगाने निपटारा होण्यासाठी जळगाव जिल्हा आयोगातील अध्यक्षांसहित सर्व रिक्त पदांची भरती करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा कारणे ,
संघटना वाढीसोबत ग्राहक हितास प्राधान्य देणे ,
*दिशाभूल करणा-या आणी फसव्या जाहिरातीबाबत ग्राहक जागृती करणे ,यासह अनेक महत्व पूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील मा.सदस्य तथा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (पारोळा), जिल्हाध्यक्ष हेमंतदादा भांडारकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.सुभाष किसन महाजन,तालुका अध्यक्ष प्राचार्य रविंद्र गंगाराम माळी, उपाध्यक्ष सेवानिवृत्त तहसीलदार आर . जी.चव्हाण,नवनियुक्त नाशिक विभागीय अध्यक्ष Adv.कुंदन साळुंके आदी पूर्ण वेळ उपस्थीत होते.
बैठकीत चर्चेला आलेल्या विषयांची काटेकोर अंमल बजावणी करण्याच्या सूचना जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी यावेळी दिल्या.
सुत्रसंचालन प्रा.डॉ.सुभाष महाजन यांनी केले तर आभार प्राचार्य रविंद्र माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *