1 min read

स्वातंत्रसेनानी सुदाम मस्के ह्यांचे स्मृतिला उजाळा मिळावा…. जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे

Loading

स्वातंत्रसेनानी सुदाम मस्के ह्यांचे स्मृतिला उजाळा मिळावा…. जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे

डाळिंब ता. दौंड:(प्रतिनिधी): देशाला स्वातंत्र मिळविण्यासाठी स्वातंत्र सेनानी म्हणून समर्पित भावनेने कार्य करणारे डाळिंब गावाचे भूषण स्व सुदाम मस्के ह्यांचे नाव दुर्लक्षित राहिले. प्रती पंढरपूर म्हणून ख्यातनाम आसलेल्या डाळिंब गावाचे भूषण स्व सुदाम मस्के ह्यांचे नावे स्मृति स्तंभ व बगीचा व्हावा. पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार श्रीमती रंजना ताई कुल प्रमुख पाहुणे असताना स्व सुदाम मस्के ह्याचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला होता.ह्या वेळी अध्यक्षीय भाषण जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी केले व हि मागणी करण्यात आली होती.आज त्यांचा सुपुत्र बजरंग मस्के सरपंच म्हणून नियुक्त झालेत त्यानी स्वातंत्र सेनानी सुदामराव मस्के ह्याच्या कार्याची दाखल घेऊन त्यांच्या स्मृतीला उजाळा आणावा ,असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. श्री बजरंग सुदाम मस्के ह्याची डाळिंब येथे ग्रामपंचायत सरपंच पदी नियुक्ती झाली त्याबद्दल सत्कार कार्यक्रमांत वरील मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे यांनी व्यक्त केले. ह्या पुढे बोलताना डॉ भोळे म्हणाले की बजरंग मस्के ह्यानी स्व बॅरिस्टर व तत्कालीन खासदारविठ्ठल गाडगीळ ह्यांचे माध्यमातून केलेले रचनात्मक कार्य वाखाणण्यासारखे आहे . ह्या कार्यक्रमात डाळिंब गावाचे बाळासाहेब मस्के माजी सरपंच, विलास राव मस्के माजी चेअरमन विविध कार्यकारी सहकारी संस्था व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *