1 min read

संत तुकडोजी महाराज यांचे कर्तृत्व आम्ही मनिलाल शिंपी यांच्यामध्ये पाहतो-मिथुन शुक्ला
ठाणे,कल्याण

Loading

संत तुकडोजी महाराज यांचे कर्तृत्व आम्ही मनिलाल शिंपी यांच्यामध्ये पाहतो-मिथुन शुक्ला
ठाणे,कल्याण

दि.२७( विशेष प्रतिनिधी)स्वच्छ
भारत अभियान संघटन कल्याण डोंबिवली युनिटचे संचालक श्री.मिथुन शुक्ला यांनी ठाणे जिल्हा आर.एस.पी.अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांची मंगळवार दिनांक २७/१२/२०२२ रोजी सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी श्री.शुक्ला यांना खूप आनंद झाला व ते म्हणाले की मानवसेवेचे व्रत घेतलेले खरे तपस्वी देवदूत तसेच माणसात देव शोधणारे मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ. मनीलाल शिंपी खरोखरच यांचे कार्य समाजहिताचे आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्यात संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांचे कर्तृत्व दिसले आहे.म्हणून आम्ही शिंपी सरांच्या संकल्पनेनुसार, मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, कपडे वाटप आणि ऊसतोड कामगार, आदिवासी महिलांना साड्या,ब्लँकेट वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मानवसेवेचे कार्य करीत आहोत. म्हणून त्यांचा आम्ही शाल व!! श्रीमद् भगवद्दगीता !! यथार्थ गीता!!हा महान ग्रंथ देऊन सन्मान करीत आहोत. तसेच येणाऱ्या नवीन वर्षात
मकरसंक्रांत सणाच्या निमित्ताने २५० ब्लँकेट, व साड्या वाटप स्वच्छ भारत अभियान संघटन कल्याण डोंबिवली यांच्या माध्यमातून मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या सहकार्याने करणार आहोत, असे होम ॲपलॉइन्स चे संचालक मिथुन शुक्ला यांनी
यावेळी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *