1 min read

धरणगाव येथे शिक्षक संवाद मेळावा !….शिक्षक संघटना ही शिक्षकांची ऊर्जा – एस. डी.भिरुड सर

Loading

धरणगाव येथे शिक्षक संवाद मेळावा !….

शिक्षक संघटना ही शिक्षकांची ऊर्जा – एस. डी.भिरुड सर

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव – शिक्षकांचा समस्या आणि शिक्षणाच्या बाबत शासनाचे धोरण उदासीन आहे.आपल्या रास्त मागण्या शासनाकडे मांडण्यासाठी संघटना हेच व्यासपीठ आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येवुन लढा देण्याची गरज आहे शासनाच्या चुकीच्या धोरणाना प्रखर विरोध करण्यासाठी भविष्यात एकसंघ राहून काम करणे गरजेचे आहे. संघटना हीच शिक्षकांची ऊर्जा आहे असे मत जिल्हा माध्य.शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष एस्.डी.भिरुड यांनी व्यक्त केले येथील इंदिरा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित शिक्षक संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समन्वय समितिचे अध्यक्ष यु यू पाटील होते विचारमंचावर माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते एच जी इंगळे, जिल्हा पतपेढीचे माजी अध्यक्ष आर्.एच्.बाविस्कर,
धरणगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सी के पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस एस पाटील, एस के पाटील,एम एच चौधरी, डॉ.संजीवकुमार सोनवणे आदी उपस्थित होते. या वेळी शासनस्तरावर, शिक्षण उपसंचालक ,संचालक कार्यालयात, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची विविध समस्या बाबत संघटना करीत असलेल्या प्रयत्नाची माहिती श्री भिरूड यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिले, फरकाची बिले, पी एफ पावत्या, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा शालार्थ आय डी, अर्धवेळ ग्रंथपाल ,आदी विविध समस्या वर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष एच्.जी.इंगळे, पतपेढीचे माजी अध्यक्ष आर एच बाविस्कर, समन्वय समिती चे अध्यक्ष यू यू पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी के पाटील, सूत्रसंचलन डी एस पाटील तर आभार एस एस पाटील यांनी मानले कार्यक्रमाला तालुक्यातील मुख्याध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मेळावा यशस्वितेसाठी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय चे पर्यवेक्षक ए एस पाटील, एन बी पाटील, बापू शिरसाठ, बी आर महाजन, पी डी पाटील, एस बी घुगे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *