भारतीय संस्कृतीत तुळशीला सर्वाधिक महत्व !—–ज्योत्स्ना जाधव
![]()
ख्रिसमस दिनी सनातन भारतीय संस्कृतीत सांगितले तुळशी चे महत्व!!

भारतीय संस्कृती मध्ये मानवी जीवनात तुळशीचे महत्व खूपच मोठे आहे.तुळसी एकाचवेळी खूप रोगांचे निर्मूलन करते मानसिक ताण तणाव कमी करते वारकरी संप्रदायात ही तुळसी महत्वपूर्ण आहे.तुळसी नकारात्मक शक्तती पासून बचाव करते असे ज्योत्स्ना प्रमोद जाधव यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले ते ख्रिसमस दिनी सनातन भारतीय संस्कृतीत तुळसी महत्व सांगत होते तुळशी दिनानिमित्त श्री.समर्थ क्लासेस भुसावळ येथे बोलत होते पुढे ते सांगतात की दमा कावीळ,केस गळणे,कर्करोग अनेक आजारांवर तुळसी गुणकारी आहे तसेच जगात अनेक देशात तुळसी वर संशोधन प्रक्रिया चालू आहे.महिलांनी अंगणात तुळसी लावल्याने रोग प्रतिकारक शक्ति निर्माण होते.ज्योत्स्ना जाधव हे सामाजिक क्षेत्रात हि कार्यरत असून सावित्रीमाई फुले महिला मंडळ अमळनेर येथे सचिव व उपाध्यक्षा म्हणून सक्रिय आहेत तसेच क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच महिला आघाडी च्या पदाधिकारी म्हणून फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार जनमानसात पोहचवण्याचे कार्ये करत असतात यावेळी असंख्य विध्यार्थी वर्ग पालक उपस्थित होते.

