1 min read

समाजाला संविधान साक्षर करणे शिक्षकाचा धर्म असला पाहिजे-समता शिक्षक परिषदेच्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी डॉ.श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

Loading

समाजाला संविधान साक्षर करणे शिक्षकाचा धर्म असला पाहिजे

  • समता शिक्षक परिषदेच्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी डॉ.श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
    शिक्षक संस्कृतीचा महानायक असल्याने समाजाला संविधान साक्षर करणे शिक्षकांचा धर्म आहे . निती आणि अनिती या दोघांत भारताचं भविष्य अधांतरी लटकले आहे . कधी नव्हे तेवढी आज लोकशाही धोक्यात आलेली आहे. धर्माधिष्ठित विचार समाजाला अत्यंत चुकीच्या दिशेने नेत आहेत. राजकारणी, एकांगी चळवळी,संघटना व अतिरेकी विचारांमुळे भारतीय लोकशाही व संविधान संकटात सापडल्याने आज संविधान संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अ .भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले .महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदे मार्फत रविवार दि .२५ डिसेंबर २०२२ रोजी प .न . लुंकड शाळा,जळगाव येथे आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ.सबनीस उद्घाटकीय मार्गदर्शन करतांना बोलत होते.आज देशाला शिक्षकच वाचवू शकतो. म्हणून शिक्षकांनी माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या विचारांना रोखण्यासाठी तयार राहिले पाहिजे. समता शिक्षक परिषद हे फुले- शाहू -आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या समतेवर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी चालविलेले मिशन आहे. वैचारिक मंथन घडवून आणणे आणि बुद्धाचा प्रेम हा विचार घेऊन क्रांती प्रस्थापित करणे असा उदात्त हेतू या संघटनेचा आहे. शिक्षण क्षेत्राला अशाच प्रेमाच्या आणि समतेच्या विचाराची गरज आहे, असे डॉ.सबनीस यांनी अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी
    संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब डी.के.अहिरे होते. प्रमुख अतिथी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे,ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.डी.बी. साळुंखे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे, बुलढाणा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता धम्मरत्न वायवाळ, संघटनेचे प्राथमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ,अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ मान्यवर उपस्थित होते.
    प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.संघटनेच्या समता विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. प्रा. शशीकांत बारी लिखित ‘तान्हूले तू आलीस खरी…’ व वर्षा अहिरराव लिखित निबंध वर्षा आणि पोएट्री अँड पोयटिक डिव्हाइसेस इत्यादी पुस्तकांचे प्रकाशान डॉ.श्रीपाल सबनीस व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
    सत्यशोधक चळवळ १५० व्या वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे यावर्षी सत्यशोधक पुरस्काराचे वितरण संघटनेमार्फत करण्यात आले. सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांना क्रांतीसुर्य तात्यासाहेब ज्योतीराव फुले सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे यांना प्रभावती बावस्कर यांचे स्मरणार्थ सावित्रीमाई फुले सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर डॉक्टर अनिल झोपे,सत्यशोधक अरविंद खैरनार व निवेदिता ताठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या राज्य अधिवेशना संदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाठ यांनी मांडली. पुरस्कारार्थी शिक्षकांमधून डॉ.अतुल सूर्यवंशी, प्रा.शशिकांत बारी व लक्ष्मण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समता विशेषांका मागील भूमिका समता शिक्षक परिषदेचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षा मनीषा देशमुख यांनी केले. विविध सत्रातील कार्यक्रमाचे संचलन अश्विनी कोळी, रंजना इंगळे, भारती ठाकरे, शंकर भामेरे, टी.बी. पांढरे, बी. एन. पाटील, गणेश बच्छाव यांनी केले. जिल्हास्तरावरील २८ व राज्यस्तरावरील ६ गुणवंत शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी अतुलनीय श्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कारार्थींचे मित्रपरिवार, आप्तेष्ट व शिक्षक बंधु भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
    जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार- १ ) वर्षा आबासाहेब अहिरराव – या. दे. पाटील माध्यमिक विद्यालय मेहरूण, जळगाव २ ) सुधीर रघुनाथ महाजन – आर.आर. विद्यालय जळगाव ३ ) डॉ. अतुल संतोष सूर्यवंशी – एम.एम. ज्युनिअर कॉलेज पाचोरा ४ ) प्रा. नंदन वसंतराव वळींकार- अ.ध.चौधरी विद्यालय व ज्यू. कॉलेज डोंगरकठोरा ता. यावल ५ ) प्रशांतराज सुपडू तायडे – ए.एस. घाटे हायस्कूल व ज्यू.कॉलेज उचंदा ता. मुक्ताईनगर ६ ) कल्पना शामराव विसावे – पी.आर. प्राथमिक विद्यालय धरणगाव
    ७ ) प्रशांत भीमराव नरवाडे- रांका हायस्कूल बोदवड ८ ) मुकेश रघुनाथ बुंदे- श्री. रेणुकादेवी माध्य. विद्यालय बोदवड ९ ) लक्ष्मण प्रभाकर पाटील- गुड शेफर्ड इंग्लिश मेडीअम स्कूल धरणगाव १० ) सरिता विजय वासवानी – आर.एस. आदर्श हायस्कूल भुसावळ ११ ) वैशाली वसंत जंजाळे – राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ १२ ) चैतन्य बाबुराव नवगिरे – महात्मा फुले हायस्कूल एरंडोल १३ ) योगेशकुमार राघो बोरसे- माध्य. विद्यालय करजगाव ता. चाळीसगाव १४ ) अशोक नथू देवरे- मुख्या. माध्य. विद्यालय बहाळ चाळीसगाव १५ ) कैलास रामदास पाटील –श्रीमती एस. पी. भांडारकर प्राथ. विद्यामंदिर अमळनेर १६ ) श्रीमती पाकिजा रामदास पिंजारी – जि.प. शाळा वावडे ता. अमळनेर
    १७ ) पूनम विजय चौधरी – श्री. ग. गो. बेंडाळे हायस्कूल विवरे ता. रावेर १८ ) श्रावण मांगो महाजन – जयहिंद माध्यमिक विद्यालय चाळीसगाव १९ ) शोएब अहेमद शेख नुरुद्दीन- अंग्लो उर्दू हायस्कूल पाचोरा २० ) विजयसिंग आधारसिंग पवार- भिका यशोद चौधरी हायस्कूल शिरसाळे
    २१ ) शरद सीताराम महाजन – सौ. सु. गी. पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव
    २२ ) जितेंद्र राजाराम देवरे – विवेकानंद विद्यालय चोपडा २३ ) श्रीमती हर्षाली दिलीप पाटील- श्री. समर्थ प्राथमिक विद्या मंदिर आव्हाने शिवार, जळगाव २४ ) उत्तम बाबुराव चिंचाळे – आर.एन.लाठी विद्यालय भोकर २५ ) नाना काशिनाथ मोरे- मुख्या., व्ही.एच. पटेल प्राथ. विद्यालय चाळीसगाव २६ ) श्री. प्रदीप रमेश पाटील, मुख्याध्यापक, माध्यमिक विदयालय, शिवरे दिगर, ता. पारोळा २७ ) श्रीमती वनिता शिवाजी बेरड- कुलकर्णी अनु जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव, जि जळगाव
    २८ ) श्री. नारायण नागो अजलसोंडे (पर्यवेक्षक )
    भारत विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय न्हावी, तालुका -यावल जिल्हा -जळगाव
    राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार-
    १ ) श्रीमती योगिता देटका पावरा – वाल्मिकी माध्य.विद्यालय पुरुषोत्तमनगर शहादा जि. नंदुरबार २ ) बाळकृष्ण गुलाबराव बाविस्कर – सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालय जाफराबाद जि. जालना ३ ) पठाण अमजद मुसाखान – अंग्लो उर्दू हायस्कूल नंदुरबार ४ ) महेश धनसिंग तायडे – भगीरथ विद्यालय, जळगाव ५ ) प्रा.शशिकांत शिवराम बारी– सेंटमेरी उच्चमाध्य. विद्यालय वाहेगाव ता. गंगापूरजि. औरंगाबाद ६ ) रितेश कौतिक खरे माध्यमिक विद्यालय जळे केंगपाडा ता. पेठ जि. नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *