ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे ; राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड
![]()

ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे ; राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड
अतनूर / प्रतिनिधी ग्राहक हा अर्थव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा घटक असून अर्थव्यवस्थेचा ग्राहक हा महत्त्वाचा चाक आहे. ग्राहक म्हणजे दैवत असून ग्राहकांच्याच भोवती सगळी अर्थव्यवस्था फिरत असते. जागरूक ग्राहक हा चांगल्या बाजाराला आणि अर्थव्यवस्थेला चालणा देत असतो. आजही ग्राहकात खूप मोठे अज्ञान आणि अंधश्रध्दा आहे. ग्राहक आजही फसव्या जाहिरातीना मोठ्या प्रमाणात बळी पडत असतो. ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संस्थांनी मोठ्या प्रमाणात ग्राहक जागृती करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक माणूस हा ग्राहक आहे आणि प्रत्येक ग्राहक जागृत होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी केले. लातूर येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा कार्यकारणीची बैठक राज्यअध्यक्ष डाॅ.विजय लाड (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्राहक मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे, अभ्यासवर्ग अयोजीत करणे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे कार्य, संघटना बांधणी याबद्दल मार्गदर्शन व चर्चा झाली. यावेळी संघटनेचे विभागध्यक्ष सतिश माने, विभाग संघटक प्रा.हेमंत वडणे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद तिवारी, लातूर जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सहसंघटक शरद सुर्यवंशी निलंगा, भोसले औसा, भागवत धुमाळ निलंगा, भीमराव बिराजदार, उपाध्यक्षा सौ.लक्ष्मीबाई मरडे, सहसंघटक सौ.संगिता पदकोंडे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक झाली. त्यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचा जिल्हासंघटक या नात्याने योग्य मार्गदर्शन केलो व करित आहे. ग्राहकामध्ये जनजागृती झाल्या मुळे आत्मीक समाधान लाभते आणि त्यामुळे जनजागृती करण्या बद्दल प्रोत्साहन मिळाले. यावेळी मोफत ग्राहकहित सल्ला व मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. जिल्हाअध्यक्ष डॉ.तिवारी यांनी जानेवारीत मराठवाडा स्तरीय अभ्यासवर्ग चाकूर ला घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात जिल्हाआढावा जिल्हासंघटक बालासाहेब शिंदे यांनी सांगितले.तर आभार प्रदर्शन निलंगा तालुकाअध्यक्ष भागवत धुमाळ यांनी मानले.

