1 min read

सांगली येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशनास उपस्थित राहावे-आर.डी.बोरसे

Loading

सांगली येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशनाची तयारी सुरू आहे. या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल. त्यात जास्तीत जास्त शिक्षकेतर बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री आर डी बोरसे कार्याध्यक्ष श्री विजय पवार जिल्हा सचिव श्री योगेश भोईटे यांनी केले आहे.
सांगली येथील कर्नाळा रोड वरील धनंजय गार्डन येथे आठ जानेवारी 2023 ला हे अधिवेशन होईल त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनामध्ये शिक्षकेतरांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. 2019 च्या नवीन आकृतीबंधानुसार शिक्षकेतर यांची नवीन भरती सुरू करणे. आश्वासित प्रगती योजना (१०-२०-३०) लागू करणे. शिक्षकेतरांना पदोन्नती पदोन्नतीची संधी देणे. असे विषय असतील. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे शिवाजी खांडेकर, सतीश नाडगवडा मिलिंद जोशी अनिल माने आणि सर्व राज्यपदा अधिकारी मेहनत घेत आहेत. या अधिवेशनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष व जिल्हा सचिव यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *