1 min read

पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी —–

Loading

पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी ——-! ! !

अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 24 डिसेंबर रोजी पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी नाताळbनिमित्ताने सांताक्लॉज च्या वेशभूषेत आलेल्या मितेश पियुष कुमार सोनवणे या लहान बालकाच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच अर्चना महाजन मॅडम यांनी साने गुरुजी यांच्या जीवनातील कथा आणि जीवन प्रसंग तसेच आपल्या अंमळनेर नगरीतील प्रताप हायस्कूल या ठिकाणी पूज्य साने गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान अर्थातच “खरा तो एकची धर्म ,जगाला प्रेम अर्पावे” तसेच” बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो” ही गीत तालासुरात गाऊन दाखवली. जशी मुले ही देवाघरची फुले असतात ,आणि निष्पाप असतात त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात नेहमी खऱ्याचा, सत्याचा मार्ग अनुसरला पाहिजे. आणि जनसेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच वैष्णवी चंद्रकांत लोहार या विद्यार्थिनींनेही साने गुरुजी यांच्या जीवन कार्याविषयी माहिती कथन केली. सदर प्रसंगी मुख्याध्यापक संदीप पवार, व्ही .डी. पाटील, पी .एम. ठाकरे ,ए. पी. जाधव, आर. डी. महाजन, एम .एस सुशिर, ए .पी .जाधव, वाय. जे .पाटील, डी. एस. कारले, आणि शिक्षिका सी. डी.निकम, आर एम ताडे , बी. एस. चव्हाण, एस. एस . तेले पी.पी .पाटील, तसेच नूतन सोनवणे आधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए .सोनवणे यांनी केले. आणि सर्व कार्यक्रमाच्या तयारीसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले.