1 min read

बाभुळगाव येथे गटविकास अधिकार सुशांत आप्पा पाटील यांच्या उपस्थिती पालक मेळावा संपन्न

Loading

बाभुळगाव येथे गटविकास अधिकार सुशांत आप्पा पाटील यांच्या उपस्थिती पालक मेळावा संपन्न

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगाव :- तालुक्यातील बाभूळगाव येथे काल गट विकास अधिकारी सुशांत आप्पा पाटील यांनी गावाला भेट दिली. या प्रसंगी गावात सुरू असलेले घरकुल योज ना तसेच गावातील विकास कामे, तसेच ग्रामस्थांच्या समस्या इतर बाबींचा आढावा घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी, समस्या समजून घेऊन त्या लवकरात लवकर दूर करण्याचे श्री पाटील यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. तसेच शासनासाचे नवीन नियम निकष व घरकुल योजना संदर्भातील महत्वाची माहिती ग्रामस्थांना दिली. तसेच गावातील जि.प.शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी घेतली. तसेच जि.प शाळेत पालक मेळावात पालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, जि.प. शाळेचे शिक्षक, शेतकी संघ चे चेअरमन नीलकंठ शंकर पाटील उपस्थित होते. व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *