1 min read

सत्याच्या कसोटीत उतरून प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करावे…. शिवलाल स्वामी

Loading

सत्याच्या कसोटीत उतरून प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करावे…. शिवलाल स्वामी

उरुळीकांचन: दुर्मिळ अशा मनुष्य जन्माचे साफल्य अध्यात्म ज्ञान भक्तिनेच होते. मनुष्य देह नाशिवंत आहे, ह्या नाशवंत देहाचे कोडकौतुक करण्यासाठीमनुष्य जन्मभर परिश्रम करुन जीवन घालवतो. साधकाने परमेश्वर भक्ती व संतसंगतीचा अंगीकार करावा. सर्व सुख प्राप्तीनंतर उदास त्यागप्रवृती ठेवावी . अश्या भक्तांचा विषय नारायण होउन भौतिक सुखाची लालसा राहत नाही. मनुष्याने तज्ञ, दान, तप, कर्म करणे अत्यंत आवश्यक व महत्वाचे असते मात्र प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करावे. सत्य कर्माला साह्य व्हावे व सत्याच्या कसोटीत उतरून प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करावे असे प्रतिपादन शिवलाल स्वामी वय शंभर ह्यांनी येथे व्यक्त केले. उरुळीकांचन येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचेआयोजन करण्यात आले. ह्यावेळी सद्गुरू शिवलाल स्वामी ह्यांनी कीर्तन करूनवरिल मार्गदर्शन केले. ह्याच सप्ताहात स्वामीचे अनुग्रहीजेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांनी वारकरी, भाविक भक्त, टाळकरी, व ज्ञानेश्वरी पारायनातील भाविक भक्त ह्याची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार केले गेली . तीस वर्षे पासून डॉ रविंद्र भोळे हि विनामूल्य वैद्यकिय सेवा मोफत पुरवीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *