शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा..शिक्षक आघाडी भाजपा
![]()

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा..
ठाणे,कल्याण मनिलाल शिंपी ):विकास पाटील, प्रदेश सहसंयोजक, शिक्षक आघाडी , भाजपा
भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने प्रदेश सहसंयोजक विकास पाटील सर, कोकण विभाग संयोजक एन.एम.भामरे सर व कोकण विभाग कार्यवाह विनोद शेलकर सर यांनी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी शिक्षण उपसंचालक श्री.संदिप सांगावे साहेब यांच्या उपसंचालक कार्यालयात प्रकरण निहाय चर्चाविनिमय केला. शिक्षकांच्या तक्रारीनुसार ठाणेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी महोदयांनी मुख्याध्यापक पदाची दिलेली चुकीची मान्यता,बंद पडलेल्या रात्रशाळेतील अतिरिक्त अर्धवेळ शिपायांना संस्थातर्गत समायोजन प्रक्रियेद्वारे दिवसाच्या पुर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यक अथवा तत्सम पदोन्नतीस मान्यता न देणे.अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयातील प्रलंबित वैयक्तिक मान्यतेचे प्रस्तावावर निर्णय न घेणे.प्रलंबित शालार्थ आयडीचे प्रस्तावाकडे दुर्लक्ष करणे.वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावावर निर्णय न घेणे.वरिप्ठवेतन श्रेणी व निवड श्रेणी अजूनही बऱ्याच शिक्षकांना लागू केलेली नाही.अशा एक ना अनेक समस्यावर सखोल चर्चा केल्यानंतर मा.शिक्षण उपसंचालक,संबंधित संस्था,संबंधित कर्मचारी आणि मा.शिक्षणाधिकारी यांच्यसह सुनावणी द्वारे विहित कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा त्वरेने करावा यासाठी भाजपा शिक्षक आघाडीने मा.श्री.संदिप संगवे साहेबांना निवेदन देऊन चर्चाविमर्श केला आणि मा.शिक्षण उपसंचालक महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देवून शक्य असतील तेवढी सर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी त्वरेने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले…शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपा शिक्षक आघाडीने कंबर कसली आहे. झिरो पेंडीग संकल्पनेवर आधारित कार्यालयातील कार्यप्रणाली व कार्यसंस्कृती निर्माण केल्यास प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि अधिकारी वर्गाबद्दल आदराची व सन्मानाची भावना निर्माण होईल असं भाजपा शिक्षक आघाडीने जाणीव करुन दिली…! अशी माहिती कोकण विभाग संयोजक एन.एम.भामरे सर यांनी दिली

