चामुंडा माता बुद्धीशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न..
![]()

चामुंडा माता बुद्धीशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा, येथील विशेष विद्यार्थी रोशन पाटील याने दिनांक १८/१२/२०२२ रोजी *सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा परिषद व जिल्हा समाज कल्याण विभाग जळगाव व जळगाव जिल्हा दिव्यांग शाळा, कार्यशाळा यांचे संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा स्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धां आयोजन करण्यात आलेले होते.यावेळी चि.रोशन ने उत्कृष्ट असा खान्देशी गाण्यावर मनसोक्त नृत्य सादर केले.हम मी किसीसे कमी नहीं,हमको हरां सके किसी से दम नहीं,हे विद्यार्थी कलेत कमी नाहीत.हे उद्दिष्ट हाच उद्देश समोर ठेवून मा.अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर (अध्यक्ष चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव ) माध्यमातून मोफत विशेष शिक्षणाची सोय सन २००५ पासुन उपलब्ध करून दिली.तसेच विशेष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पण स्वतः “दिव्यांग सेवा हिच ईश्वर सेवा’ हे कर्तव्य मनात रुजवून आज ते पण अगदी मेहनतीने मुलांना शिकवतात, प्रशिक्षण देतात.सन २००५ पासुन स्वखर्चातून, घरखर्चातुन मा. अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर ही विशेष शाळा चालवित आहेत तसेच यांचा सांभाळ पण करित आहेत.

