अमळनेरात प्रथमच भरणार माहेरवाशीणींचा स्नेह मेळा,वाणी समाजातील विवाहित सुकन्याना लागली माहेरची ओढ
![]()
अमळनेरात प्रथमच भरणार माहेरवाशीणींचा स्नेह मेळा
वाणी समाजातील विवाहित सुकन्याना लागली माहेरची ओढ
सुयोग महिला मंडळाची जय्यत तयारी सुरू
अमळनेेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-आपले माहेर म्हणजे विवाह झालेल्या लेकींसाठी नंदनवनच,अश्या विवाह झालेल्या वाणी समाजातील शेकडो लेकींचा स्नेहमेळाच अमळनेरात भरणार असून यामुळे या लेकींना माहेरी येण्याची मोठी ओढच लागली आहे,या सोहळ्याची जय्यत तयारी अमळनेरला सुरु झाली आहे.
लाडशाखीय वाणी समाज संचलित सुयोग महीला मंडळातर्फे आयोजित हा माहेर वाशीण नामक स्नेह मेळा रविवार दि.25 डिसेंबर 2022 रोजी लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय,अमळनेर येथे पार पडणार आहे.यानिमीत्ताने अमळनेर च्या वाणी समाजातील ज्या कन्या विवाहानंतर सासरी गेल्या आहेत अश्या सुमारे 300 पेक्षा अधिक कन्या महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील विविध गावाहून आपल्या माहेरी येणार आहेत .यानिमित्ताने आयोजकांनी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


असे आहे सोहळ्याचे नियोजन,,, अमळनेरचे ग्रामदैवत संत सखाराम महाराज वाडीतुन सकाळी 8 वा हिरव्या पैठणी व फेटे परिधान करून लेकींची सवाद्य मिरवणूक निघणार आहे,कार्यालयात आल्यानंतर सर्वाचे औक्षण फुलाच्या पाकळ्यांनी माहेरी आल्याचं स्वागत होईल.यानंतर लेकींच्या कलागुणांना वाव म्हणुन विविध कार्यक्रमाचे दिवसभर नियोजन आहे..सासरी गेलेल्या सर्व मुली एकाच वेळी एकत्र येण्याचा हा सोहळा प्रथमच होत आहे. मायेची ऊब देणाऱ्या या सोहळ्याची कार्यालयात अतिशय उत्कृष्ट सजावट करून नियोजनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान कार्यक्रमाची प्रवेशिका असलेल्यांनाच यावेळी प्रवेश असेल अशी माहीती सुयोग महीला मंडळाच्या मंगला ब्राम्हणकार,पुष्पा भामरे ,शकुंतला येवले, छाया कोठावदे ,पुष्पा नेरकर,वर्षा कुडे,रेखा मोराणकर,उज्वला शिरोडे,रेखा मार्कडें ,जयश्री येवले ,ममता अमृतकार,अर्चना तलवारे ,शारदा कोठावदे,रजनी केले या कार्यकारी मंडळाने दिली आहे .

