साउली…
![]()
साउली…
अहोरात्र…साथ देते…
सगळे वार, झेलते…!
हळूंच कुरवळते…
मज,कधी न भुलतेे…!
कीती गेले,सोडून ते…
मज नाही,आठवती…!
मायेचा, हात ठेवते…
ती रोज,खांद्या वरती…!
वादळात उभी अशी…
कडा होउनी, ती जशी…!
तो,अहं:कार मुळाशी…
जराही नसे, तिच्याशी..!
अंर्तमनांत माझ्या ती…
श्वासात, भिनत जाते…!
बळ जगण्याचे देते…
अफाट…संकटाशी ती…!
अशी,सार्मथ्यं शाली …
माझी,”साउली”…
इथे,जीवन वाहते…!
‘शेवटी’….
मज,सरणांवरती…
का, सोडून जाते…!
बबनराव वि.आराख
गांगलगाव,
बुलडाणा
7875701806


