उपक्रमशील शिक्षिका
वसुंधरा लांडगे यांचे खासदारांकडून अभिनंदन…!
![]()

उपक्रमशील शिक्षिका
वसुंधरा लांडगे यांचे खासदारांकडून अभिनंदन…!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)–
आपल्या जिल्ह्याचे तरुण तडफदार व कर्तृत्ववान खासदार दादासाहेब उन्मेष पाटील यांच्याकडून वसुंधरा दशरथ लांडगे यांना “पु.अहिल्यादेवी होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार”मिळाल्याबद्दल तसेच लोकमत वृत्तपत्र समुहाकडून “वुमन ॲचिवर्स ॲवार्ड”(कर्तृत्ववान महिलांचा सन्मान) मिळाल्याबद्दल अनुक्रमे दि.२२आक्टोबर २०२२ आणि १० नोव्हेंबर २०२२ अशी दोन अभिनंदनपर पत्रे प्राप्त झाली.त्यात ताईंच्या कार्याचा यथोचित सन्मान झाला.असा उल्लेख आहे.तसेच समाज कार्याचा वसा घेऊन आपल्या कार्यशैलीतून वर्तमानात घडणाऱ्या सकारात्मक बाबींना समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भात अभिनंदन केले.आपल्या वक्तृत्वाने सकारात्मक मतप्रवाह निर्माण होवून आपल्या हातून लोकोपयोगी कामे होतात व जनजागृती ही होते.अशा शब्दात पत्रात गौरव केला.त्याबद्दल माननीय खासदार उन्मेषजी पाटील यांना लांडगे परिवाराकडून खूप खूप धन्यवाद दिले.लांडगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

