1 min read

महाविकास आघाडीचा मुंबई येथे महामोर्चा!,असंख्य कार्यकर्त्यांसोबत आमदार अनिल पाटील मुंबई येथे रवाना

Loading

महाविकास आघाडीचा मुंबई येथे महामोर्चा!

असंख्य कार्यकर्त्यांसोबत आमदार अनिल पाटील मुंबई येथे रवाना —-

राष्ट्रवादी पक्षाचा मित्र पक्षांसोबत महाराष्ट्र द्रोह्याच्या विरोधात हल्लाबोल

अमळनेर —– महाराष्ट्र राज्य सरकारचा मागील सहा महिन्यांपासुन सुरु असलेला भोंगळ कारभार, श्री. छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांविषयी सत्ताधार्यांकडून होणारी बेताल वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, महागाई, बेरोजगारी, अशा विविध समस्या विषयी या मोर्चाचे आयोजन उद्या ता.17 रोजी सकाळी सकाळी 9.30 वाजता मुंबई येथे करण्यात आले असल्याने अमळनेर विधान सभा मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांनी आज ता.16 रोजी सायंकाळी असंख्य कार्यकर्त्यांसोबत मुंबई येथे रवाना झाले आहेत.
महाविकास आघाडीच्या या मोर्च्यातुन सद्यस्थितीत राज्य सकारच्या दुटप्पी धोरणमुळे राज्यातील सर्व सामान्य जनता भरडली जात आहे. यातच नेहमी महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य केले जात आहेत. राज्यात कुठल्याच प्ररकारचा विकासात्मक दृष्टीकोन नाही. यात कुणी आंदोलन केले तर त्यांचा आवाज दाबून टाकून हुकूमशाही वृत्तीचा प्रकार वाढलेला असल्याने महाविकास आघाडीने मुंबई येथे राज्यातील लाखो जनतेच्या उपस्थितीत हल्ला बोल मोर्च्याचे आयोजन केले असून यावेळी हा मोर्चा मुंबई येथे रिचर्डसन अँड कृडास, नागपाडा, मुंबई पासून निघणार आहे.
अमळनेर तालुक्यातून अमळनेर राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रतोद तसेच विधानसभेचे आमदार अनिल पाटील, यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधी,असंख्य नागरिक या मोर्च्यासाठी मुंबई येथे रवाना झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *