1 min read

लोंढवे येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी तालुका स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत प्रथम.

Loading

लोंढवे येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी तालुका स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत प्रथम.
लोंढवे,ता.अमळनेर (दि.०६/१२/२०२२) येथील स्व.आबासो.एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अमळनेर तालुका हिंदी शिक्षक मंडळ, पंचायत समिती (शिक्षण विभाग)अमळनेर व यूनियन बॅक ऑफ इंडिया, शाखा शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा
तंत्र्याचा अमृत महोत्सव व राष्ट्रभाषा हिंदी दिवसाचे औचित्य साधून तालुका स्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात तालुक्यातील ग्रामीण भागातून कु.प्रतिक्षा अरूण पाटील ही ने प्रथम क्रमांक पटकावला तर शालेय स्तरावर यश विजय पाटील,माहेश्वरी अशोक पाटील, वैष्णवी कैलास पाटील यांना प्रोत्साहनपर स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री दिपक मुरलीधर पवार,सर मनोहर प्रकाश देसले,सर यांना कृतिशील हिंदी शिक्षक पुरस्काराने मा.श्री.विश्वास हरी पाटील ( गटशिक्षणाधिकारी , अमळनेर ) यांच्या हस्ते काल अमळनेर येथील प.पू.सानेगुरूजी पतपेढी च्या सभागृहात संपन्न समारंभात गौरविण्यात आले.सदर स्पर्धेत विद्यालयातून १०५ विद्यार्थी सहभागी झाले होते.सर्व यशस्वीतांचे संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार आबासाहेब डॉ.बी.एस.पाटील , विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.बाळासाहेब जिवन पाटील तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *