1 min read

“ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्ह्याची बैठक संपन्न “

Loading

ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्ह्याची बैठक संपन्न

अमळनेर दि. ५ ग्राहक कल्याण फाऊंडेशन या ग्राहक संघटनेची जिल्हा बैठक रविवार दि.४ डिसेंबर रोजी खड्डा जीन अमळनेर येथे जिल्हा अध्यक्ष हेमंत भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीस महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (जळगाव), जिल्हा सचिव Adv. जास्वंदी भंडारी (भुसावळ),जिल्हा पदाधिकारी अशोक महाजन (रावेर),कैलास महाजन (एरंडोल),प्रा.डॉ.सुभाष किसन महाजन (अमळनेर),Adv.कुंदन साळुंके (अमळनेर),स्रीरोग तज्ञ डॉ.विनोद कोतकर (चाळीसगाव),जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सौ.मेधा भांडारकर (अमळनेर), ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे तालुकाध्यक्ष प्राचार्य डॉ.रविंद्र माळी (अमळनेर),रोहित मगर (जळगाव), संजय झोपे (यावल),योगेश महाजन (चोपडा),योगेश भोकरे (चाळीसगाव), कैलास कोळी (मुक्ताईंनगर), गोपीचंद सुरवाडे (बोदवड),विजय पाटील (रावेर) , भूषण रतन महाजन (जळगाव) ,राजधर महाजन,नितीन ठक्कर,नितीन पाटील, पंकज महाजन (एरंडोल),
यांची उपस्थिती होती.
बैठकीत संघटनात्मक निर्णय घेण्यात आले.
२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करणे,जिल्ह्यातील खराब रस्ते,अपूर्ण पाणी पुरवठा,वाहतुक कोंडी ,बेसुमार अतिक्रमण ,सार्वजनिक स्वच्छता,तोकडी आरोग्य व्यवस्था ,ऑन लाईन फसवणुकीचे वाढते प्रमाण, प्रशासनातील लोकाभिमुखतेचा अभाव , बस स्थानकामधील अस्वच्छता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीस विकास महाजन,हेमंत भांडारकर ,Adv.जास्वंदी भंडारी ,Adv.कुंदन साळुंके ,भूषण रतन महाजन यांनी मार्गदर्शन केले.
सूत्र संचालन प्राचार्य डॉ.रविंद्र माळी यांनी केले.तर आभार प्रा.डॉ.सुभाष महाजन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *