जि.एस मैत्री ग्रुपचा अमळनेरात रंगला स्नेहमेळा,तब्बल 27 वर्षानंतर भेटले
![]()

जि एस मैत्री ग्रुपचा अमळनेरात रंगला स्नेहमेळा
तब्बल 27 वर्षानंतर भेटले शाळकरी मित्र
अमळनेर-सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयातील जुने मित्र एकत्रित येण्याची परंपरा सुरू झाली असताना अमळनेर येथील जि.एस हायस्कुल मध्ये 1994-95 ला दहावीत असलेल्या शाळकरी मित्रांचा स्नेह मेळा जि एस मैत्री ग्रुपच्या माध्यमातून नुकताच अमळनेरात पार पडला.
अमळनेर शहरात गलवाडे रस्त्यावर डॉल्फिन गार्डन जवळ पार पडलेल्या या स्नेह मेळ्यात 1995 लाच दहावीत असलेले शहरातील इतर शाळातील मित्र देखील आनंदाने सहभागी झाले होते.काही बाहेरगावी असलेले मित्र खास स्नेह मेळ्याच्या निमित्ताने अमळनेरात दाखल झाले होते,यात जळगाव येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.परीक्षित बाविस्कर,मुंबई येथील विशाल भावसार यासह इतरांचा समावेश होता,सदर मेळाव्यात सर्वप्रथम दिवंगत झालेला मित्र स्वर्गीय लेनिन देशमुख यासह इतर दिवंगत मित्रांना आदरांजली अर्पण करण्यात आली.यानंतर सर्व मित्रांनी आपली सद्यस्थिती,प्रगतीची वाटचाल आणि पारिवारिक माहिती सांगितली.शाळेतील मौजमस्ती आणि विविध आठवणींना उजाळा देखील देण्यात आला.तब्बल 27 वर्षांनंतर जुने मित्र भेटल्याने सारेच सुखावले होते,सर्वांचीच झालेली प्रगती पाहून साऱ्यांनी आनंद व्यक्त केला.यानंतर निसर्गरम्य वातावरणात संगीत नृत्यावर सर्वांनी ठेका घेतला,तर काहींनी गीत गायन व विविध कला सादर करून मित्रांची मने जिंकली.विशेष म्हणजे पोंगे- बटाटे,निमलेट व असमनतारा गोळी,चॉकलेट,गटागट,बोरकूट या सारख्या लहानपणीच्या खाऊवर सर्वांनीच ताव मारत लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या.शेवटी गप्पांच्या मैफलीत स्नेहभोजन पार पडुन असेच पुन्हा पुन्हा भेटत राहू आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ असा संकल्प करून आनंदाने सर्वांनी एकमेकांना मिठी मारत निरोप घेतला.
या स्नेह मेळ्यात अमळनेर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.भूषण पाटील व इतर उपस्थित न राहिलेल्या बाहेरगावच्या मित्रांनी व्हिडीओ कॉल्लिंग द्वारे हजेरी लावली.यावेळी अमळनेर येथील न प रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास महाजन,वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल चौधरी तसेच पत्रकार चेतन राजपूत,विजय चौधरी,संतोष पाटील,सूरज सराफ,भागवत माळी,अनंत निकम,वृषभ पारेख,जयेश पाटील,निलेश पाटील,जितेंद्र चुंबाळकर,हितेश शाह,चेतन जाधव,निलेश देवपूरकर,रवींद्र लांडगे,प्रमोद पवार,गुणवंत पाटील,नितीन भावसार,नवीन अग्रवाल,ऍड माधवराव बडगुजर,भारत सासनानी,विशाल शर्मा,सचिन खंडारे,तुषार मोरे,विठ्ठल पवार,रघुवीर गिरनार,मयूर बागल,प्रकाश सोनार,धनंजय पाटील,मंगेश काळकर,रंगराव पाटील,परदेशी,जितेंद्र जेठवा, आदी सहभागी झाले होते.

