शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
![]()

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
पातोंडा ता.अमळनेर (वार्ताहर) नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आली.
” डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्या पुण्यतिथी निमिक्त प्रतिमेचे पूजन प्र. प्राचार्य डॉ. पी.पी. चौधरी.डॉ. एन.के. वाणी. डॉ.ए. के. जोशी. डॉ एन.जी.पाचपाडे, डॉ. जे. एन. चव्हाण. प्रा.यु. बी. पाटील. डॉ.एस.सी तायडे प्रा. के.वाय. देवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यतेसह अनेक चुकीच्या प्रथा नष्ट करण्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी गोरगरिब-वंचित घटकांची स्थिती सुधारण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बौद्ध धर्माचे अनुयायी मानतात की, ते भगवान गौतम बुद्ध प्रमाणेच दुसऱ्यासाठी जीवन जगले. बौद्ध अनुयायांच्या मते डॉ. आंबेडकरांनाही त्यांच्या कार्यातून निर्वाण मिळाले आहे. म्हणूनच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली. जाते असे विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी शिक्षक सोमवंशी जयेश, धनगर कल्पेश, बारी प्रथमेश, राहुल वाडीले, मोहित सोनवणे. यांनी विचार मांडले. महाविद्यालयात विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन जयेश सोमवंशी व आभार प्रदर्शन राहुल वाडीले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिकेत सूर्यवंशी, किरण रावळ, राजू वाघ, विनोद सोनवणे यांनी सहकार्य केले.
प्रा. जितेश चव्हाण पातोंडा प्रतिनिधी

