डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक-अरविंद सोनटक्के
![]()



डॉ बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक
अरविंद सोनटक्के
अमळनेर प्रतिनिधी
भ्रष्टाचार अनिती अत्याचार अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते .जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय अन्याय आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले असे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव देवळी येथे
कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के मार्गदर्शन करतांना बोलत होते…
कार्यक्रमाची सुरवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी प्रतिमेचे पूजन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी माल्यार्पण केले.
शाळेत वत्कृत्व स्पर्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर घेण्यात आल्या. त्यात आठवी ते दहावीतील 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला परीक्षक म्हणून एच.ओ माळी यांनी काम पाहिले.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर शिक्षक एच ओ.माळी,व एस के महाजन यांनी आपले मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन एस के महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

