1 min read

चैतन्यमय महर्षी शांडिल्य तपोभूमीला ऊर्जितावस्था यावी… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे

Loading

चैतन्यमय महर्षी शांडिल्य तपोभूमीला ऊर्जितावस्था यावी… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे
शेलगाव बाजार ता. मोताळा जी बुलढाणा: तपस्वी योगी महर्षी शांडिल्य थोर तत्वज्ञ, विचारवंत, दर्शनकार होते. भगवान श्रीकृष्णाला योगविद्या महर्षि शांडिल्यऋषिकडून मिळाली म्हणजे ते भगवान श्रीकृष्णाचे एक गुरू होते, अष्टांगयोगाचे प्रणेते महान उपासक होते. दत्तात्रेयाच्या अनेक ग्रंथात महर्षी शांडिल्य ऋषीचा नामोउच्चार होतो. अश्या शेलगाव बाजार येथिल पवित्र तपोभूमीला योगयोगेश्वर, ब्रह्मचैतन्य संतश्रेष्ठ गजानन महाराज ह्या भूमीत वास्तव्यास राहून पुरातन शांडिल्यतपो भूमीत नतमस्तक व्हायचे, असे जाणकार पूर्वीपासून सांगत असत . अश्या प्रकारे अनेक प्राचीन इतिहास असलेली शांडिल्य तपोभूमी अनेक साधू, संत, योगी, तपस्वी ह्याच्या पदस्पर्शाने पुण्यवान झालेली आहे मोहगंगा नदीच्या संगमतीरी महर्षी शांडिल्य तपोभूमी श्रीक्षेत्राचे पूनृस्थापन होउन जीर्णोद्धार व्हावा. चैतन्यमय महर्षी शांडिल्य तपोभूमीला ऊर्जितावस्था यावी असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांनी तेथे व्यक्त केले. डॉ रविंद्र भोळे ह्यांनी मोहगंगा संगम तीर्थ व महर्षी शांडिल्य तपोभूमीतील पूजनीय अवषेश्यांचे दर्शन लाभ घेतला. ह्यावेळी डॉ रविंद्र भोळे पुढे म्हणाले की महर्षी शांडिल्यऋषींनी मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक ग्रंथसंपदा लिहिली. ह्यामध्ये शांडिल्य उपनिषद, शांडिल्य भक्तीसूत्रे, शांडिल्य संहिता, शांडिल्य स्मृति, शांडिल्य धर्मसूत्रे, शांडिल्य वेदविचार, शांडिल्य तत्वदीपिका तसेच अनेक महान ग्रंथ शांडिल्य गोत्र असणाऱ्या व्यक्तीसाठीच नसून सर्व जाती धर्माच्या मानवाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी लिहिलेत. अनेक महानुभाव शांडिल्य गोत्र असलेले जगात विख्यात असून सर्वांनी ह्या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत असेही आवाहन डॉ रविंद्र भोळे यांनी तेथे केले काही वर्षांपूर्वी महादेव मंदिर स्थळ पर्यटन स्थळ व्हावे ह्यासाठी प्रयत्न केले होते व ते मूर्त स्वरूपात आले. मात्र अजुनही मुळ शांडिल्य तपोभूमी दुर्लक्षित आहे .ह्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खर्चे पाटील ह्यांनी ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांना श्रीफळ देऊन सन्मानित केले. याप्रसंगी अनिल मुरलीधर खर्चे, राजेंद्र एकनाथ खर्चे, बाळू वराडे, सेवेकरी नारायण सोपान वराडे, वायरमन राजेंद्र भंगाळे सावरगाव जहागीर व प्रतिष्ठित गावकरी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *