1 min read

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुस्तकं भेट

Loading

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुस्तकं भेट

मुंबई – शरद बनसोडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मुंबईतील काही सामाजिक संस्थांनी आवाहन केले होते की बाबासाहेबाना अभिवादन करणार तेव्हा एक वही किंवा एक पुस्तक अर्पण करा. याआवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी पुस्तकं जमा करणाऱ्या अनुयायी पत्रकार पुनम पाटगावे यांना काही पुस्तकं भेट स्वरूपात दिली. यावेळी जमा होणारी पुस्तकं ही आम्ही विविध ग्रांथालयांमध्ये, स्टडी सर्कल मध्ये ठेवणार आहोत जेणेकरून वाचकांना ती वाचता येतील, हाताळता येतील, त्याचा वापर उपयोग करता येईल असे पुनम पाटगावे म्हणाल्या.वाचन संस्कृती जपता यावी यासाठी हिरवे सरांनी आतापर्यंत साधारण चौदा हजारांच्या आसपास पुस्तक विविध वाचनालये, क्रीडा स्पर्धा, पाहुणे, मित्र मंडळी नातेवाईक, विविध संस्था यांना विनामूल्य भेट दिली असून वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते व कोणत्याही प्रसंगी पुस्तक भेट सुलभ सोप असून ते देण्याचं समाधान खूप मोठ आहे असे हिरवे सांगतात.सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली असून ती जपण्यासाठी हिरवे यांनी जोपासलेल्या छंदाचे अनेकांनी कौतुक केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *