लोकमान्य विद्यालयाचे श्री. राजेंद्र निकुंभ सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न !
![]()

लोकमान्य विद्यालयाचे श्री. राजेंद्र निकुंभ सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न !
लोकमान्य विद्यालयातील ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्री राजेंद्र दिनकरराव निकुंभ हे ३०/११/२२ रोजी सेवानिवृत्त झाले. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. प्रतापराव पाटील यांच्या हस्ते निकुंभ सरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच लोकमान्य शिक्षण मंडळ बालविकास मंदिर नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय व निकुंभ सरांवर प्रेम करणारे स्नेही जन यांच्यातर्फे ही निकुंभ सरांचा सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात जिल्हा नियोजन अधिकारी श्री प्रतापराव पाटील , लोकमान्य शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आणि बाल विकास मंदिर , नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी श्री प्रतापराव पाटील , श्री आत्माराम चौधरी सर , श्री. रविंद्र लष्करे सर , श्री मच्छिंद्र मोरे सर , श्री जे. के . चौधरी सर , श्री सतीश देशमुख सर श्री जे. डी. निकम सर तसेच लोकमान्य शिक्षण मंडळाचे श्री प्र. ज. जोशी सर , श्री विवेक भांडारकर , श्री राजेंद्र नवसारीकर , श्री डी . डी. पाटील या संचालकांनी आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला श्री फुल पगारे सर . श्री राजेंद्र खाडिलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्री.विजय सुर्यवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका देशपांडे यांनी केले.

