खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी आज येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात साजरी
![]()

अमळनेर ( ) खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी आज येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात साजरी करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अमळनेर येथे आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आलेल्या मान्यवरांनी प्रताप तत्वज्ञान केंद्रास भेट दिली. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करून प्रताप तत्वज्ञान केंद्राच्या वाटचालीची माहिती देण्यात आली. त्यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

