इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात उच्च शिक्षणावर राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

जलगांव (प्रतिनिधी)
इकरा एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत एच जे थीम महाविद्यालय मेहरून जलगांव आणि मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीच्या (MANUU) केंद्राच्या माध्यमातून मेहरून, जलगांव येथील एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स' मध्ये "औपचारिक, दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण तसेच कौशल्य आणि क्षमता बांधणी" या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद व अभिमुखता (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान इकरा एच. जे. महाविद्यालय आणि हैदराबादची मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी यांच्यात परस्पर सहकार्यासाठी सामंजस्य करार (MOU) करण्यात आला, जो दोन्ही संस्थांमधील दृढ संबंधांचे प्रतीक आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. अख्तर शाह यांनी तिलावत कुराण ने केली. प्रास्ताविक डॉ. तनवीर खान यांनी मांडले, तर अध्यक्षीय अनुमोदन प्रा.डॉ. मुस्तकिम बागवान यांनी दिली. यानंतर तराना' इकरा सादर करण्यात आला.
इकारा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.
प्रमुख पाहुणे: मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीचे संचालक श्री. रझाउल्ला खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, मुंबईचे डॉ. अब्दुल बरकात आणि डॉ. निसार अहमद पीरजादा हे विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते.
इतर मान्यवर: डॉ. इफ्रान इक्बाल, सईदा वकील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तनवीर खान, प्रा. अंजली कुलकर्णी आणि प्रा. डॉ. विकार शेख आदी उपस्थित होते.
प्रमुख उपक्रम व मार्गदर्शन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मौलाना मुजम्मिल काझी यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकार शेख यांनी कार्यक्रमाचा उद्देश उपस्थितांसमोर स्पष्ट केला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अब्दुल बरकात यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. रझाउल्ला खान यांनी उच्च शिक्षणातील विविध संधींवर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच 'औपचारिक, दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण आणि कौशल्य विकास' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन
अध्यक्षीय भाषणात इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "आज तुमच्यासमोर उच्च शिक्षणाच्या अनेक सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि उच्च शिक्षण घेऊन स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे."
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. चांद खान यांनी आभार मानले. या राष्ट्रीय परिसंवादास बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी, एच. जे. थीम महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्ग, डी एड कॉलेज चे प्राचार्य व स्टाफ व विद्यार्थी, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प...
अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवे...
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्...
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाचा निर्...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच ह...