Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र

शब्दांना पंख, कवितेला नवे आकाश!

प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांच्या ‘गाव-शिवारातल्या कविता’ आणि ‘शब्दधन वाटू जनलोका’ या दोन काव्यसंग्रहांचा ८ ऑक्टोबरला प्रकाशन सोहळा
ईश्वर रामदास महाजन 18 Sep 2026, 13:53 328 views अपडेटेड 08 Oct 2026, 02:51 6 min read
🔧 साधने:
शब्दांना पंख, कवितेला नवे आकाश!
थोडक्यात‘गाव-शिवारातल्या कविता’ या शीर्षकातूनच ग्रामीण मातीशी, गावकुसाशी आणि शिवाराशी जोडलेल्या भावविश्वाची झलक दिसून येते. तर ‘शब्दधन वाटू जनलोका’ या संग्रहाच्या माध्यमातून शब्द हे समाजासाठी संवेदना, विचार आणि साहित्यिक समृद्धीचे माध्यम ठरू शकतात, असा आशय अधोरेखित होतो.

जळगाव प्रतिनिधी | जळगाव

जळगावच्या साहित्यविश्वात काव्याचा सुगंध दरवळवणारा आणि मराठी साहित्यरसिकांसाठी विशेष पर्वणी ठरणारा एक महत्त्वपूर्ण सोहळा येत्या गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) निवृत्त अधिकारी, साहित्यिक आणि कवी प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘गाव-शिवारातल्या कविता’ आणि ‘शब्दधन वाटू जनलोका’ या दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

जळगाव शहरातील नवीन स्थानकाजवळील हॉटेल रिगल पॅलेस येथे सकाळी १०.३० वाजता हा प्रकाशन सोहळा रंगणार आहे. ग्रामीण जीवन, मातीशी असलेले नाते, माणसांचे भावविश्व, सामाजिक जाणिवा आणि शब्दांमधून व्यक्त होणाऱ्या संवेदनशीलतेचा काव्यमय आविष्कार या निमित्ताने रसिकांना अनुभवता येणार आहे.

या दोन्ही काव्यसंग्रहांचे प्रकाशन पुणे येथील सुप्रसिद्ध विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक तथा ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डाएटचे निवृत्त प्राचार्य तथा माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड राहणार आहेत. तर ज्येष्ठ साहित्यिक अशोक नीळकंठ सोनवणे आणि कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे हे दोन्ही काव्यसंग्रहांविषयी आपले विचार मांडत त्यातील साहित्यिक आशय, काव्यवैशिष्ट्ये आणि लेखनातील संवेदनशीलतेचा वेध घेणार आहेत.

साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यासाठी साहित्य, शिक्षण आणि काव्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अहिराणी साहित्यिक प्राचार्य डॉ. बापूराव देसाई, डाएटचे विद्यमान प्राचार्य डॉ. अनिल झोपे, खिरोदा येथील प्राध्यापक तथा क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. साहेबराव भूकन, कविवर्य डॉ. अशोक कौतिक कोळी तसेच अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी यांची मान्यवर अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे.

प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांनी शिक्षण क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ अनुभवासोबतच साहित्य आणि काव्यलेखनाच्या माध्यमातून समाजजीवनाशी असलेले नाते सातत्याने जपले आहे. त्यांच्या लेखणीतून उमटणाऱ्या कविता या केवळ शब्दांची मांडणी नसून, अनुभव, संवेदना, सामाजिक भान आणि मानवी जीवनातील विविध छटांना अभिव्यक्त करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्या दोन काव्यसंग्रहांच्या प्रकाशनाची साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘गाव-शिवारातल्या कविता’ या शीर्षकातूनच ग्रामीण मातीशी, गावकुसाशी आणि शिवाराशी जोडलेल्या भावविश्वाची झलक दिसून येते. तर ‘शब्दधन वाटू जनलोका’ या संग्रहाच्या माध्यमातून शब्द हे समाजासाठी संवेदना, विचार आणि साहित्यिक समृद्धीचे माध्यम ठरू शकतात, असा आशय अधोरेखित होतो.

या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने जळगावच्या साहित्य क्षेत्रात विचारांची आणि काव्याची समृद्ध मैफल रंगणार असून, साहित्यप्रेमी, कवी, लेखक, शिक्षक, वाचक आणि रसिकांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.

प्रा. डॉ. दशरथ साळुंखे व स्नेहीजन मित्रपरिवाराच्या वतीने साहित्य क्षेत्रातील मान्यवर, कवी, लेखक, वाचक आणि रसिक स्नेहीजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साहित्यिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीव्हायरल’चा विघ्न! अमळनेरमध्ये तापाची धग; गर्दीत फिरताना जरा सांभाळा! पुढील बातमी →गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या २९ वाहनांवर कारवाई

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!