Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र

३०-३५ वर्षांची सेवा... तरी पेन्शनसाठी संघर्ष! ,जामनेर-बोदवडच्या पेन्शनपीडितांचा एल्गार; २८ सप्टेंबरला आझाद मैदानात शक्तिप्रदर्शनाचा निर्धार

ईश्वर रामदास महाजन 22 Sep 2026, 12:59 870 views अपडेटेड 10 Oct 2026, 17:59 5 min read
🔧 साधने:
३०-३५ वर्षांची सेवा... तरी पेन्शनसाठी संघर्ष!    ,जामनेर-बोदवडच्या पेन्शनपीडितांचा एल्गार; २८ सप्टेंबरला आझाद मैदानात शक्तिप्रदर्शनाचा निर्धार

३०-३५ वर्षांची सेवा... तरी पेन्शनसाठी संघर्ष!

जामनेर-बोदवडच्या पेन्शनपीडितांचा एल्गार; २८ सप्टेंबरला आझाद मैदानात शक्तिप्रदर्शनाचा निर्धार

जामनेर प्रतिनिधी

एक नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच अनुदानित तुकड्यांवर नियुक्त होऊन त्यानंतर शंभर टक्के अनुदान मिळालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेच्या मागणीला पुन्हा धार आली आहे. याच पार्श्वभूमीवर जामनेर-बोदवड तालुक्यातील पेन्शनपीडितांची सहविचार सभा इंदिराबाई ललवानी माध्यमिक विद्यालय, जामनेर येथे उत्साहात पार पडली.

सभेला जुनी पेन्शन समन्वयक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. शांताराम पाटील, उत्तर महाराष्ट्र शिक्षक नेते आप्पासाहेब संभाजी पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. ए. पाटील, जामनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष खलसे सर, ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनवणे सर यांच्यासह जामनेर व बोदवड तालुक्यातील पेन्शनपीडित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सेवा केली, आता सुरक्षित भविष्य द्या!’

प्रास्ताविकात आर. ए. पाटील यांनी जुनी पेन्शनच्या मागणीची पार्श्वभूमी, कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि आगामी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. “वर्षानुवर्षे सेवा केल्यानंतर निवृत्तीचे आयुष्य आर्थिक सुरक्षिततेत जावे,” अशी भावना सभेत व्यक्त करण्यात आली.

२८ सप्टेंबरला आझाद मैदानाकडे लक्ष

डॉ. शांताराम पाटील यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या साखळी उपोषणात जामनेर-बोदवड तालुक्यातील पेन्शनपीडितांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. मागणीसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जुनी पेन्शनच्या मागणीला व्यापक राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी विधानसभेतील सर्व २८८ आमदारांकडून पाठिंबा पत्रे मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

“३०-३५ वर्षांच्या सेवेनंतर म्हातारपणाची काठी हवी!”

उत्तर महाराष्ट्र शिक्षक नेते आप्पासाहेब संभाजी पाटील यांनी ३० ते ३५ वर्षे सेवा करूनही निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणे ही गंभीर चिंता असल्याचे सांगितले. दीर्घकाळ सेवा केल्यानंतर निवृत्तीचे आयुष्य सुरक्षित असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कुटुंबासहित मुंबईत जाण्याचा निर्धार

सभेच्या अखेरीस जामनेर व बोदवड तालुक्यातील पेन्शनपीडित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २८ सप्टेंबर रोजी आझाद मैदान, मुंबई येथे कुटुंबासहित मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा सामूहिक संकल्प केला.

वर्षानुवर्षांच्या सेवेचा मोबदला आणि निवृत्तीनंतरची सुरक्षितता या मागणीभोवती आता जामनेर-बोदवडचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचणार असून, शासनाच्या पुढील भूमिकेकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीबहुजन समाजाच्या शिक्षणाचे शिल्पकार - कर्मवीर भाऊराव पाटील पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज १३९ वी जयंती निमित्त लेख पुढील बातमी →नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंच्या समावेशाबाबत उपसमिती गठीत करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!