Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र

हिंदीच्या प्रचार-प्रसाराचा जागर; साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांनी हिंदी सप्ताह उत्साहात , वक्तृत्व स्पर्धेत कल्याणी पाटील प्रथम; तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या दृष्टी चौधरीचा सत्कार

ईश्वर रामदास महाजन 21 Sep 2026, 14:30 996 views अपडेटेड 11 Oct 2026, 16:00 5 min read
🔧 साधने:
हिंदीच्या प्रचार-प्रसाराचा जागर; साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांनी हिंदी सप्ताह उत्साहात ,   वक्तृत्व स्पर्धेत कल्याणी पाटील प्रथम; तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या दृष्टी चौधरीचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये हिंदी दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण सप्ताह विविध शैक्षणिक उपक्रम व स्पर्धांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये हिंदी भाषेविषयी आवड, आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती कौशल्य निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंदी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच हिंदी सामान्यज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदी सप्ताहाच्या समारोपप्रसंगी सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा. श्री. संदिप घोरपडे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक केले. “या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थिनी हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असून, हिंदी भाषेचा गौरव वाढवत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – कल्याणी पाटील (इयत्ता १० वी-अ), द्वितीय क्रमांक – दिव्यानी पाटील (इयत्ता १० वी-अ), तृतीय क्रमांक – पूजा पाटील (इयत्ता १० वी-अ) तर उत्तेजनार्थ – अक्षरा साळुंखे (इयत्ता ८ वी-अ) हिने मिळवला. विजेत्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या दृष्टी चौधरी हिचाही अध्यक्षांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तिला श्री. मुकेश पाटील सर व श्री. आर. एम. देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले.

“प्रत्येक भाषा शिका, ज्ञानाची कक्षा विस्तारा”

अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे सचिव श्री. संदिप घोरपडे यांनी विद्यार्थिनींना विविध भाषा शिकण्याचे आवाहन केले. “तुम्ही प्रत्येक भाषा शिका आणि ती समजून घ्या. भाषा शिकल्याने आपल्या ज्ञानामध्ये निश्चितच वृद्धी होते. संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करून हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य केल्याबद्दल विद्यार्थिनी आणि हिंदी शिक्षकांचे मनापासून कौतुक,” असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमकांत पाटील तसेच संचालक मंडळाने हिंदी सप्ताहाच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण हिंदी सप्ताहाचे आयोजन हिंदी शिक्षक श्री. दिलीप पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिलीप पाटील सर यांनी केले, तर श्री. मुकेश पाटील सर यांनी आभार मानले. विद्यार्थिनी, शिक्षक व मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाची सांगता झाली.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमी ‌ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या सहभागातून गणेशभक्तीचा अनोखा सोहळा; ३१ हजारांहून अधिक अथर्वशीर्ष मंत्रांचे पठण पंचामृत अभिषेक व २१ आवर्तनांच्या सामूहिक पठणाने विद्यालय परिसर भक्तिमय पुढील बातमी →'पेन्शन आमचा हक्क; आता शेवटपर्यंत संघर्ष!’ , अमळनेरमध्ये पेन्शनपीडितांची सहविचार सभा; ‘आझाद मैदानावरील लढाईत पूर्ण ताकदीने उतरा’ — डॉ. शांताराम पाटील

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!