Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

मराठी लाईव्ह न्यूजच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ या विशेष गौरव सोहळ्यासाठी नारायणी महिला मंडळाची प्रेरणादायी यशोगाथा: , भक्तीच्या सुरातून समाजप्रबोधनाची वाट… ,श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेर

ईश्वर रामदास महाजन 23 Oct 2026, 08:57 995 views अपडेटेड 25 Oct 2026, 18:16 6 min read
🔧 साधने:
मराठी लाईव्ह न्यूजच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ या विशेष गौरव सोहळ्यासाठी नारायणी महिला मंडळाची प्रेरणादायी यशोगाथा: ,   भक्तीच्या सुरातून समाजप्रबोधनाची वाट…    ,श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेर

श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेर

भक्ती, एकजूट, संस्कृती आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर संगम म्हणजे श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेर!

‘मी’पणाला दूर ठेवून ‘आपण’ या भावनेतून समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास घेतलेल्या या महिला मंडळाने आपल्या सुरेल भजनातून आणि वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणातून अमळनेर तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सन २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीत मंडळाने तब्बल १३१ कार्यक्रम सादर केले आहेत. पुणे, नाशिक, मुंबई, उज्जैन, धुळे, जळगाव, नंदुरबार, पारोळा, धरणगाव, चोपडा, शिरपूर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, इंदूर, यावल, रावेर, शेगाव, मुक्ताईनगर अशा विविध शहरांमध्ये व महाराष्ट्राच्या अनेक भागांत मंडळाच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आता शाळांमध्येही समाजप्रबोधनपर कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि सकारात्मक विचार रुजविण्याचे कार्य सुरू आहे.

नारायणी महिला मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ भजन सादर करणे नव्हे, तर प्रत्येक कार्यक्रमातून सामाजिक संदेश देणे. वेगळ्या धाटणीचे आकर्षक प्रेजेंटेशन, भक्तीमय वातावरण आणि समाजप्रबोधनाचा संदेश यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना एक वेगळाच आनंद आणि प्रभाव प्राप्त होतो.

कृष्णाष्टमीनिमित्त मुक्ताईनगर येथे आयोजित भजन संध्या कार्यक्रमात मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून अमळनेरच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंडळातील महिला भगिनींचा ‘मराठी लाईव्ह न्यूज’ व ‘प्रखर जनसंवाद’ यांच्या वतीने शालू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या यशामागे अध्यक्ष पूजाताई पाटील यांच्यासह उपाध्यक्ष कल्पनाताई पाटील, सचिव शोभाताई पाटील, कोषाध्यक्ष मेघाताई पाटील, संचालक मालतीताई पाटील, सुवर्णाताई पवार, सुनिताताई पाटील आणि भारतीताई पाटील यांची अथक मेहनत आहे. कार्यक्रमाच्या तयारीपासून ते शेवटच्या सादरीकरणापर्यंत उत्साह, शिस्त आणि समर्पण कायम ठेवणारे हे मंडळ आज अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान बनले आहे.

सत्काराला उत्तर देताना मंडळाच्या भगिनींनी पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला व्यापक प्रसिद्धी मिळत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्याची दखल घेऊन प्रोत्साहन देणे, महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजहिताच्या उपक्रमांना प्रसिद्धी देणे, हीच सकारात्मक पत्रकारितेची ताकद असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले.

आज अमळनेर तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात नारायणी महिला मंडळ हे एक विश्वासाचे आणि प्रेरणेचे नाव बनले आहे. भक्तीला समाजप्रबोधनाची जोड देत, संस्कृतीची परंपरा जपत आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडवत हे मंडळ सातत्याने पुढे जात आहे.

भक्ती त्यांच्या सुरांत…

एकजूट त्यांच्या कृतीत…

समाजप्रबोधन त्यांच्या ध्येयात…

आणि अमळनेरचा नावलौकिक त्यांच्या कर्तृत्वात!

‘मराठी लाईव्ह न्यूज’च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ मध्ये श्री नारायणी महिला मंडळाचा गौरव म्हणजे त्यांच्या सेवाभावी, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाला मनापासूनची मानवंदना!

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीशिक्षण, समाजसेवा, सहकार आणि पत्रकारितेतून कर्तृत्वाचा ठसा श्री. प्रमोद पंढरीनाथ चिलाणेकर पाटील यांचा ‘सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ मध्ये गौरव **शिक्षणातून परिवर्तन, समाजसेवेतून माणुसकी आणि पत्रकारितेतून जनहिताचा ध्यास** पुढील बातमी →३४ वर्षांच्या शैक्षणिक सेवेतून हजारो विद्यार्थिनींच्या स्वप्नांना दिशा , श्रीमती अनिता दीपक बोरसे यांचा ‘सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ मध्ये गौरव, कर्तव्यनिष्ठा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कारांची जपणूक करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व*

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!