समाजसेवेच्या कार्याला राज्यस्तरीय सलाम! शोभाताई रघुनाथ शिंदे यांना ‘समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान

अमळनेर प्रतिनिधी: समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने कार्यरत राहून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या अमळनेर येथील नाथपंथी समाज उत्तर महाराष्ट्र महासंघाच्या अध्यक्षा सौ. शोभाताई रघुनाथ शिंदे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत ‘राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
नॅशनल ह्यूमन राईट्स अँटी करप्शन सोशल जस्टिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासो. अशोक पवार, राज्य अध्यक्ष दादासो. प्रफुल्ल पाटील तसेच प्रदेश अध्यक्षा ताईसो. प्रा.मंदाकिनी भामरे मॅडम व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, समन्वयक प्रमोदिनी पाटील मॅडम यांच्या हस्ते शोभाताई शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, पदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्यातील त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, पारदर्शक कार्यपद्धती, समाजाशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग या कार्याची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
शोभाताई शिंदे यांच्या सामाजिक कार्याची यापूर्वीही विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. ‘कोरोना योद्धा’ म्हणून त्यांचा गौरव झाला असून, मराठी लाईव्ह न्यूजच्या वतीनेही त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. याशिवाय समाजाच्या विविध संस्थांकडून त्यांचा अनेकदा सत्कार व सन्मान करण्यात आला आहे.
विशेषतः महिला वर्गाशी असलेला त्यांचा व्यापक संपर्क आणि महिलांच्या विविध प्रश्नांमध्ये त्या घेत असलेला सक्रिय सहभाग ही त्यांच्या सामाजिक कार्याची महत्त्वाची बाजू मानली जाते. समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून योगदान देण्याचे कार्य त्या सातत्याने करीत आहेत.
त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर झालेली दखल ही अमळनेर तसेच नाथपंथी समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शोभाताई रघुनाथ शिंदे यांच्यावर विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
गझलेची मैफल, साहित्यिकांच्या भेटीगाठी अन् आठवणींचा सुंदर प्र...
नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "सम...
दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकार...
अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळत...
गझलेच्या दोन ओळींत उमटतो समाजाच्या वेदनांचा हुंकार! , ‘गझ...
ज्ञानाची सरस्वती, सेवाभावाची शक्ती अन् नेतृत्वाची दुर्गा! ...