नवीन मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर कार्यक्रमांचे सादरीकरण
1 min read

नवीन मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर कार्यक्रमांचे सादरीकरण

Loading

नवीन मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर कार्यक्रमांचे सादरीकरण

अमळनेर विशेष प्रतिनिधी
अमळनेर: येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित लोकमान्य विद्यालय व नवीन मराठी शाळे मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण शाळा परिसर तिरंगी फुगे, रिबन्स आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजवला गेला होता. सकाळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक पांढऱ्या गणवेशात शाळेच्या मैदानावर एकत्र जमले होते.
सकाळी ठीक 7.20 वाजता लोकमान्य शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई सर आणि कार्यक्रमाचे मुख्य अतिथी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस श्री विवेकानंदजी भांडारकर यांच्या हस्ते सन्मानाने ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकवताच सर्वांनी एका सुरात राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत, राज्यगीत गाऊन तिरंग्याला सलामी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.
ध्वजारोहणानंतर शाळेच्या सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विभागातील लहान मुलांनी स्वातंत्र्यसैनिकांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘ए वतन मेरे वतन’ या गीतावर उत्कृष्ट समूह गीत गायन केले. या प्रसंगी संस्थेचे मुख्य पदाधिकारीनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले आणि देशाचे सुजाण नागरिक बनण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देऊन गौरवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मकरंद रमेश निळे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *