व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देशभक्तीच्या उत्साहात रंगला ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा
![]()
व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देशभक्तीच्या उत्साहात रंगला ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा
अमळनेर प्रतिनिधी
दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. दादा पवार बांधकाम सभापती, नगरपरिषद अमळनेर यांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रगीताने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्ये,भाषणे, कविता, नाटक तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, देशाची एकता, अखंडता आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी देशभक्तीचा उत्साह निर्माण झाला.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगत देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार, प्रामाणिक व सुजाण नागरिक बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. देशभक्ती, शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.




